दोणवली
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
दोणवली हे चिपळूण शहरातील एक निसर्गरम्य ऐतिहासिक गाव आहे .रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्याच्या चिपळुण तालुक्यातील हे एक प्रमुख गाव आहे.
चिपळूण तालुक्यातील पूर्व विभाग रेखांश ७३, ७४ व अक्षांश १७, ४० दरम्यान भाग पूर्वीपासून दसपटी म्हणून ओळखला जातो. घनदाट अरण्य, उंच सहयाद्री रांगा आणि निसर्गरम्य वातारणात फुललेल्या या प्रांताचा इतिहास अन् भूगोल मराठ्यान्नी आपल्या कर्तबगारीने बदलला.
मंदिर
[संपादन]दोणवली गावाचे पेशवेकालिन श्री सिद्धीविनायक मंदिर
चिपळूण तालुक्यातील दोणवली हया निसर्गरम्य गावात पेशवेकालिन श्री सिद्धीविनायक मंदिर उभे आहे. मंदिराचा सभामंडप उघडा असून गाभारा बंदिस्त आहे. मंदिराची बांधणी जांभा दगड, गूळ, चुना इ. पासून केल्याचे जाणवते.
मंदिराचे वैशिष्टयपूर्ण बांधकाम असलेल्या घुमटास कमलपुष्पासारखा आकार दिला आहे. पूर्ण मंदिरावर सफेद चुन्याचा गिलावा आहे. गाभा-यात उजव्या सोंडेची संगमरवरी पाषाणाची सिघ्दीविनायकाची सुबक मुर्ती आहे. मंदिरासमोर प्रशस्त काळया पाषाण शिळेवर काळया पाषाणाची चित्तकर्षक विशाल पणती आहे. हे मंदिर इ.स.1774 दरम्यान थोरले माधवराव पेशवे यांनी बांधले असा उल्लेख आहे.
मंदिराचे पिछाडीस ओहोळावर असलेला मोठया आकाराच्या जांभा दगडापासून तयार केलेला अर्धवर्तुळाकृती ऐतिहासिक पूल अभ्यासकांचे कुतूहल चाळवतो. मंदिर परिसरातील आल्हाददायक वातावरण भाविकांच्या मनःशांतीस पूरक ठरते.
इतिहास
[संपादन]मराठयांच्या कर्तबगारीच्या पाऊलखुणा आजही या विभागात पहायला मिळतात. असाच असामान्य इतिहास लाभलेले दोणवली हे गाव आहे. येथे कर्तबगार मराठा ९६ कुळी घराण्यान्चे प्रामुख्याने वास्तव्य आहे , जसे धारचे पवार (पवारवाडी), शिर्के ( शिर्केवाडी ) चव्हाण - बामणे ( पवारवाडी -बामणेवाडी ) तसेच कदम,सुर्वे ,निकम ,मोरे ,घाग,जाधव, शिन्दे ईत्यादी . तसेच या गावाला पेशवाईचा इतिहास लाभल्यामुळे ब्राम्हण व वाणी समाजही आहे ,जसे परचुरे,देवरुखकर ,फडके, सन्सारे,पाथरे इत्यादी.
त्याचप्रमाणे तत्कालीन आदिलशाहीचे वतनदार-खोत मुस्लिम समाजातील ईनामदार, पावणे,कवारे,लान्डगे , डबीर असे मुस्लिम बान्धवही आहेत.
अशा प्रकारे १८ पगड १२ बलुतेदार समाजाचे सर्व जाती धर्माचे लोक या गावात सलोख्याने व बन्धुभावाने राह्तात . येथील हिदु-मुस्लिम ऐक्याची खाती तर पन्चक्रोशीत आहे..
वैशिष्ट्य
[संपादन]चिपळूणला समुद्र सहवास नसला तरी त्याची कसर भरून काढणाऱ्या खाडया पश्चिमेस थेट दाभोळ बंदरापर्यंत पसरल्या आहेत.यातील प्रमुख व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा पट्टा म्हणून अलिकडच्या काळात गोवळकोट ते मालदोली बंदरा पर्यतचा खाडी पट्टा विशेष प्रकाशात आला आहे. या दरम्यान येणारे मजरेकाशी, धामणवेली, जुबारबेट, केतकी, कंरबवणे, बिवली, चिवेली , दोणवली- सुतवी ही बंदरे पर्यटन व्यवसायासाठी अधिक अनुकूल आहेत.≈