देउळगावमही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देऊळगांव राजा तालूक्यात नागपूर ते पुणे हायवे क्रमांक १७६ वर देऊळगाव मही हे गाव वसलेले आहे. देऊळगांव महीची लोकसंख्या १०१२७ ( २०११ च्या जनगननेनुसार) आहे. देऊळगांव महीचे पुर्वीचे नांव पठाण देऊळगांव असे होते. नजीकच खडकपुर्णा धरण आहे.

📜देऊळगाव महीच्या काही ऐतिहासिक बाबी:

सन-1910 1-तत्कालीन तालुका-चिखली

2-1910ची जनसंख्या-901

3-एकूण क्षेत्र-4725 एकर

4-महसूल- 2921/- रु.

5-गावाचे मूळ रहिवासी-कसार(कांस्य धातूचा काम करणारे)

6-गावाचे जुने नाव "देऊळगाव पठान" किंवा "पठान देऊळगाव" असण्याचे कारण: फार जुन्या काळात जाफराबाद येथील पठानांनी हैद्राबादच्या निझामची मदद केली होती व याचे इनाम म्हणून निझाम ने देऊळगाव महीची पटेलकी पठानांना दिली. तेंव्हा पासून गावाचे नाव देऊळगाव पठान किंवा पठान देऊळगाव झाले होते जे नजीकच्या काळापर्यंत कायम होते. तेंव्हा पासून गावाचा प्रमुख "पटेल" असायचा जो ह्या पठान मधून असायचा व पटेलचे एक कार्यालय सुद्धा "गढी" मध्ये असायचे. 1910च्या पूर्वीपासून ही प्रथा होती व 1910ला त्या नंतर सुद्धा यावर अंमल होता.


7-देऊळगाव मही या नावातील शब्द "मही" बद्दल दोन बाबी आहेत: i) मही एका देवीचे नाव होते ज्याची पूजा कसार करायचे.

ii) गावाचे नाव "पठान" याला बदलून सर्वसमावेशक शब्द "मही" म्हणजे "माझी" असे मागणीनुसार करण्यात आले.


8-गढी: पठानांच्या ताब्यात होती व यातच पटेलचे कार्यालय होते.

9-मराठी शाळा: गावात सन 1850 पासून एक मुलांची मराठी शाळा होती ज्यात सन 1910 साली दररोज सरासरी 43 मुले शिकत असे.(म्हणजेच ह्या 43 मध्ये एक ही मुलगी नव्हती) ही मराठी शाळा म्हणजे आपल्या गावातील जुन्या ग्रामपंचायत जवळील मुलांची शाळा आहे. शाळेच्या नावावरून ही सुरुवातीपासून फक्त मुलांचीच शाळा होती हे सिद्ध होते. नजीकच्या काळात शाळा मुले-मुली सर्वांसाठी खुली करण्यात आलेली आहे.

10-गावातील प्रसिद्ध ठिकाणे: i) गढी ii) ब्रांच पोस्ट ऑफिस iii) अफू आणि दारूची दुकाने iv) डाक बंगला

11-साप्ताहिक बाजार त्या काळापासून रविवार लाच भरायचा.

12-गावातले प्रसिद्ध उत्पादन: ब्लॅंकेट्स(घोंगडी) जे धनगर समाज बनवायचे व नजीकच्या काळापर्यंत गाव ह्या ब्लॅंकेट्स साठी प्रसिद्ध होते.