दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गालफुगी झालेला मुलगा

गालगुंड किंवा गालफुगी(Mumps) हा सर्वसाधारणपणे लहान मुलांच्या लाळ ग्रंथींना होणारा विषाणूजन्य आजार आहे. बहुधा दोन्ही गालामध्ये येणारी दुखरी सूज हे त्याचे लक्षण. एका गालास आलेली सूज आणि सूज ना येणे अशी दोन्ही पर्याय कधी कधी आढळतात. पॅरोटायटिस असे त्याचे इंग्रजी नाव आहे. गालामधील लाळग्रंथीना पॅरोटिड ग्लँड असे म्हणतात. त्यामुळे हे नाव. त्याचे मम्स हे नाव ओल्ड इंग्लिशमध्ये गालामधील फुगण्याला वापरलेल्या शब्दावरून आले आहे...