दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'न्युमोनिया' हा फुफ्फुसांचा सांसर्गिक आहे. ह्यामध्ये फुफ्फुसांच्या आतील अल्वोली - म्हणजे श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिका ज्या फुफ्फुसांमध्ये वायूच्या हस्तांतरणाचे काम करतात त्या न्युमोनियाकोकस जीवाणूच्या संसर्गास बळी पडतात आणि परिणामी फुफ्फुसांमध्ये द्रव साठू लागतो. ह्या द्रवामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते व त्यात कफसारखा द्रव जमुन रहातो. न्युमोनियामध्ये एक किंवा दोन्ही फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकतो.

न्यूमोनिया हे लक्षण आहे. नेमक्या आजाराचे नाव नाही. पण डॉक्टर न्यूमोनिया फारसा काळजी करण्यासारखा आजार असल्याचे सांगतात. या आजारात प्रचलित असलेली आणखी एक वैद्यकीय शब्द म्ह्णजे डबल न्यूमोनिया- म्ह्णजे दोन्ही फुफ्फुसामध्ये संसर्ग पोहोचल्याचे लक्षण. दोन्ही फुफ्फुसामध्ये संसर्ग होणे ही सामान्य बाब आहे. न्यूमोनियामध्ये फुफ्फुसामध्ये जिवाणू, विषाणू किंवा कवकांचा संसर्ग होतो. फुफ्फुसाच्या वायुकलिकामध्ये द्रव किंवा पू साठतो. यामुळे वायुकलिकामधून पुरेसा ऑक्सिजन शरीरास मिळत नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पेशींचे कार्य नीट्से होत नाही. योग्य उपचार केले नाहीत तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे व्यक्तीचा मृत्यू ओढवतो. न्यूमोनियाचे तीन प्रकार आहेत जिवाणूजन्य, विषाणूजन्य आणि मायकोप्लाझमा (कवक). न्यूमोसिस्टिस कॅरिनी नावाच्या कवकामुळे झालेला न्यूमोनिया विरळा आहे . या प्रकारचा न्यूमोनिया सहसा एडस रुग्णाना होतो. क्षयाचे पर्यवसान कधी कधी न्यूमोनियामध्ये होते. निरोगी व्यक्तीचा मृत्यू न्यूमोनियाने सहसा होत नाही. पण न्यूमोनियाने फुफ्फुसात घर केले म्ह्णजे एड्स झालेल्या रुग्णाच्या जीवितास धोका उद्भवतो. सध्या उत्तम उपचार उपलब्ध असल्याने न्यूमोनियाने मरण पावणा-या व्यक्तींची संख्या कमी झाली आहे.