दत्तात्रय स्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दत्तात्रेय स्वामी हे कल्याण स्वामींचे सख्खे धाकटे बंधू होते. समर्थांनी कोल्हापुरला अंबाबाईच्या देऊळात कीर्तने चालू असता ,एक चुणचुणीत मुलगा अंबाजी(कल्याण स्वामी) पाहिला व आपल्या कार्यासठी त्याची मागणी करताच ,त्याची आई व धाकटा भाऊ दत्तात्रय हे तिघेंही समर्थांना शरण आले.ह्या त्रिवर्गासह समर्थ शिरगांवांत आले.तिथे गोमय मारुति स्थापून दत्तात्रय स्वामींना मठपति नेमले.तोच हा शिरगांवचा मूळ मठ.

सातारा - उंब्रज मार्गावर काशीळ फ़ाट्या वरून श्री खंडोबाची पाल ह्या रस्त्या वरून २ कि. मी.वर शिरगांव फ़ाटा पडतो.तेथून दीड कि.मी. अंतरावर हा मठ आहे.दत्तात्रय स्वामींचे सुंदर समाधी मंदिर ही शिरगांव मठात बांधण्यात आले आहे.श्री दत्तात्रय स्वामींचे पुत्र आणि शिष्य राघव स्वामी यांची मुंज समर्थाच्या मांडीवर शिरगांवला झाली.त्यांचे पुत्र आणि शिष्य श्री यशवंत स्वामी हे मनोबोधाच्या आरतीचे रचियिते होते.