तुरेवाला भारीट
Appearance
तुरेवाला भारीट किंवा शेंडीवाली रेडवा, लहान काकड कुंभार, बोचुरडी, डोंगरफेंसा, दाबुडका, फेंस किंवा शेंडूरला फेंसा (इंग्लिश:Crested Bunting; हिंदी:चिरटा, ताजदार पत्थर चिडी, पथर चिरीया) हा एक पक्षी आहे.
हा काळी व तांबूस रंगाची शेंडी असलेला चिमणीसारखा दिसणारा पक्षी आहे. याच्या अंगावरील रंग भारद्वाज पक्ष्याप्रमाणे तांबूस-तपकिरी असतो. मादी गर्द भुऱ्या वर्णाची असते. परंतु पंख व शेपटीचा रंग लाल-भुरा असतो.
वितरण
[संपादन]हे पक्षी भारत, चीन, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, लाओस, बर्मा, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांमध्ये आढळतात. भारतात काश्मीर ते पूर्व आसाम, राजस्थान आणि मध्य भारत ते दक्षिण महाराष्ट्र या भागात हे पक्षी आढळतात. ते ऋतुमानानुसार स्थलांतर करतात.
निवासस्थान
[संपादन]हे पक्षी पाषाणयुक्त माळराने, तसेच वनातील शेतीचा प्रदेश या भागात निवास करतात.
संदर्भ
[संपादन]- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली