जितेंद्र देहाडे
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. |
जितेंद्र अंकुशराव देहाडे हे महाराष्ट्र राज्यातील काँग्रेसचे नेते आहेत.[१] जितेंद्र देहाडे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस आहेत.[२] त्यांनी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून काम केले आहे.[३]
जितेंद्र देहाडे | |
जन्म | २ ऑगस्ट १९७८ पिंपरी राजा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
शिक्षण | पीएच.डी. (वनस्पतिशास्त्र) |
प्रारंभिक जीवन[संपादन]
जितेंद्र अंकुशराव देहाडे यांचा जन्म २ ऑगस्ट १९७८ रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील पिंपरी राजा गावात झाला.
शिक्षण[संपादन]
जितेंद्र देहाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून त्यांनी वनस्पतिशास्त्रात मास्टर्स आणि पीएच.डी. केली आहे.
राजकीय कारकीर्द[संपादन]
जितेंद्र देहाडे हे सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस असून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रिय सदस्य आहेत.[२] यापूर्वी ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अनुसूचित जाती (एससी) विभागाचे कार्याध्यक्ष होते.[४]
पदे[संपादन]
- २०२० - जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघ (NSUI)[५]
- सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि सचिव - महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस[६][७]
- संचालक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
- सिनेट सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ[८]
संदर्भ[संपादन]
- ^ "Jitendra Dehade(Indian National Congress(INC)):Constituency- AURANGABAD (WEST) (SC)(AURANGABAD) - Affidavit Information of Candidate:". myneta.info. 2024-01-04 रोजी पाहिले.
- ^ a b "Maharashtra Budget 2023 | छत्रपति संभाजीनगर के जनप्रतिनिधियों ने बजट पर दी मिलीजुली प्रतिक्रिया, सत्ताधारियों ने बताया बेहतर; विरोधियों ने कही ये बात | Navabharat (नवभारत)". www.enavabharat.com. 2024-01-04 रोजी पाहिले.
- ^ पानसरे, जगदीश (2019-08-14). "दुसरी बेल वाजत नाही तोच साहेबांनी फोन उचलला : जितेंद्र देहाडे". Sarkarnama News. 2024-01-04 रोजी पाहिले.
- ^ "काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी देहाडे". Maharashtra Times. 2024-01-04 रोजी पाहिले.
- ^ "Pulwama attack: Parties slam attack on CRPF convoy, seek action". 2019-02-16. ISSN 0971-8257.
- ^ "निवडणुकीपर्यंत वातावरण बदलेल!". Maharashtra Times. 2024-01-04 रोजी पाहिले.
- ^ author/lokmat-news-network (2018-10-31). "राज्य सरकारच्या चौथ्या वर्धापन दिनी युवक काँग्रेसचे औरंगाबादेत अजबगजब 'निषेधासन'". Lokmat. 2024-01-04 रोजी पाहिले.
- ^ सकाळवृत्तसेवा (2018-10-09). "कुलगुरुंची माफी, कुलसचिवांची दिलगिरी". सकाळ. 2024-01-04 रोजी पाहिले.