जाई
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
|
|||
|---|---|---|---|
| शास्त्रीय नाव | Jasminum grandiflorum L. | ||
| कुळ | Oleaceae | ||
| [|येथे टिचकी मारून नवीन जोडावयाच्या जैविक वर्गिकरण गटाचे नाव येथेच का या ओळीतील मजकूर काढून लिहा सोबत समोरील तीहेरी महिरपी कंसातसुद्धा कॉपी पेस्ट करा] | {{{येथे टिचकी मारून नवीन जोडावयाच्या जैविक वर्गिकरण गटाचे नाव येथेच का या ओळीतील मजकूर काढून लिहा सोबत समोरील तीहेरी महिरपी कंसातसुद्धा कॉपी पेस्ट करा}}} | ||
जाई फूल.
- जाई हे एक प्रकारचे सुगंधी फुल असून ते वेलवर्गीय कुळात समाविष्ट होते.
- शास्त्रीय नाव: Jasminum grandiflorum L.
- कुळ: Oleaceae
- इतर भाषांमधील नावे: म- जाई, सं- जातिका, चंबेली, हिं- चंबाली, इं- Spanish jasmin, इतर- चमेली, जाती, प्रियंवदा, सुरभिगंधा
*वर्णन: सुगंधी पूजापुष्पे देणारी वेली म्हणून ही प्रसिद्ध आहे. जाईच्या वेलाचे खॊड मनगटाएवढे जाड होऊ शकते. इतर वेलीप्रमाणे ही देखील मांडवावर चांगली चढते आणि पसरते.
पाने संयुक्तपर्णी विषमसंख्य असून ५ ते ७ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. सर्व पर्णिका जवळजवळ सारख्याच आकाराच्या असतात.
जाईची फुले शुभ्र आणि नाजूक असतात. पाकळ्या खालच्या बाजूने फिक्कट गुलाबी- जांभळट असतात.
जाईची फुले नेहमी सायंकाळी फुलतात. फुलांच्या मंद सुगंधामुळे फुलांना महत्त्व प्राप्त झाले आहे. फुले अल्पायुषी असून सुकल्यानंतर लाल होतात.
*उपयोग:
- अंगातील उष्णता वाढल्यावर तोंडात फोड येतात, त्यावर जाईचा पाला चावणे हा एक उत्तम उपाय आहे.
- जाईच्या फुलांपासून सुगंधी तेल तयार करतात.
हा हस्त नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.