छिन्‍नमनस्कता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रीक भाषेत skhizein (σχίζειν ,"विभाजित होणे") आणि phrēn, phren -(φρήν, φρεν -; "मन") या पासून स्किझोफ्रेनिया (उच्चारित/ˌskɪtsɵˈfrɛniə/ या IPA: /ˌskɪtsɵˈfriːniə/), या शब्दाची निर्मिती झाली. हा एक मनोविकार आहे. कल्पना व वास्तविकता यांमध्ये गफलत असणे हे या रोगाचे साधारण लक्षण आहे. रोगाची लक्षणे तरुण वयात दिसू लागतात.

लोकसंख्येच्या साधारणतः ०.३ ते ०.७% लोग याचे बळी पडतात (२४ लाख लोग २०११ च्या आकडेवारी नुसार). हा रोग मुख्याता स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतो.


अनुक्रमणिका

कारणे [संपादन]

सर्व कारणे जरी ज्ञात नसली तरी काही कारणे सापडली आहेत. स्किझोफ्रेनिया हा एक आनुवंशिक आजार आहे. स्किझोफ्रेनिया असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबात, मुख्यतः आई वडिलांमध्ये हा रोग असण्याची शक्यता असते. जरी आनुवंशिकता हे एक कारण असले तरी ते एकच कारण पुरेसे नाही. मुख्यतः वयाच्या १३ ते १९ या काळात झालेले मानसिक आघात हेसुद्धा कारण असू शकते. म्हणजे आनुवंशिकतेमुळे विकार होण्याची शक्यता असते, परंतु जर बाह्य कारण मिळाले तर रोग दिसायला लागतो.

संकेत आणि लक्षणे [संपादन]

प्रत्यक्षात नसलेले आवाज ऐकू येणे किंवा भास होणे हे या रोगाचे मुख्य लक्षण आहे. या रोगात बोलण्याचा व विचाराचा ताळमेळ नसणे इत्यादी गोष्टीही दिसून येतात. या विकारात कल्पना आणि वास्तव यांतील फरक व्यक्तीस करता येत नाही.

निदान [संपादन]

या रोगाचे निदान करणे अतिशय अवघड असून तज्‍ज्ञांमध्ये याबाबत अनेक मतभेद आहेत. या रोगाची व्याख्या करणेही अतिशय कठीण आहे. अतिशय साध्या लक्षणांपासून अतिशय गंभीर लक्षणे या रोगात दिसतात.


सकारात्मक आणि नकारात्मक लक्षणे [संपादन]

या रोगाचे वर्गीकरण दोन वर्गात केले जाऊ शकते - सकारात्मक व नकारात्मक.

सकारात्मक लक्षण [संपादन]

ही लक्षणे सामान्य माणसात नसतात, पण या रोगाच्या रुग्णात आढळून येतात ( उदा० आवाज, भास, वैचारिक आजार इत्यादी).

नकारात्मक लक्षण [संपादन]

ही लक्षणे रुग्णांत आढळून येत नाहीत, पण बाकीच्या लोकांत आढळून येतात.