चर्चा:सर्जनशील भाषाशास्त्र

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेखनाव सर्जनशील भाषाशास्त्र बरोबर कि सृजनशील भाषाशास्त्र?

अभय नातू २१:०७, ११ सप्टेंबर २००९ (UTC)

generative हा शब्द व्याकरणाबद्दलही आहे. शाब्दबंध मध्ये दोन्ही शब्द समानार्थी दाखवले आहेत. मला स्वतःला अर्थछटांमध्ईल फरकाची कल्पना नाही. तो पर्यंत मला वाटते लेखही आधी भाषांतरीत करून घेऊ. जो शब्द अधिक चपखल आहे तेथे लेखास स्थानांतरीत करावे.

(मोनिअर-विल्यम्स् यांच्या शब्दकोशानुसार सर्जन हा शब्द बरोबर आहे, आणि सृजन हा शब्द चुकीचा ["wrong reading of सर्जन"] आहे.)

मनोगत चर्चा[संपादन]

[१]

सृजनशील आणि सर्जनशील ह्या दोन शब्दांमध्ये काय फरक आहे?

सृजनशील हा शब्द योग्य आहे का?

सृजन म्हणजे उत्पत्ती आणि सर्जन म्हणजे निर्मिती. त्यामुळे सृजनशील शब्द बनू शकेल--अर्थ उत्पत्तिक्षम, आपोआप उत्पन्‍न होण्यासारखे/करेल असे. गवत, बी-बियाणे इ.
सर्जनशील म्हणजे (प्रयत्‍नपूर्वक) निर्माण करता येण्याची क्षमता असलेला/ली (कलाकार, मनोवृत्ती वगैरे).
सर्जन-विसर्जन हे विरूद्धार्थी शब्द का? असल्यास सर्जन म्हणजे उभारून वर येऊ पाहणारे असा काहीसा अर्थ होऊ शकतो का?
सर्जनच्या विरुद्ध विसर्जन हे बरोबर वाटते. मात्र विसर्जन ह्याचा अर्थ बुडवणे किंवा खाली जाणे/नेणे असाच केवळ नव्हे. (कदाचित गणपतिविसर्जनामुळे तसे वाटत असावे.) सर्जन म्हणजे निर्माण करणे. विसर्जन म्हणजे नष्ट करणे संपवणे. सैन्यात (माझा अनुभव एनसीसीचा) परेड संपताना, किंवा शाळेत शारीरिक शिक्षणाचा कालावधी संपताना विसर्जन (डिस्पर्स? ) अशी आज्ञा असते. (ती विसऽऽऽर् - जन् अशी सैन्याच्या थाटात दिली जाते!)
तेव्हा विसर्जन हे संपवणे ह्या अर्थाने वापरत असावेत असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.
'विसर्जन'मध्ये जरी वि हा उपसर्ग 'विरुद्ध' ह्या अर्थी येत असला तरी तो नेहमीच तसा येतो असे नाही. अनेक वेळा तो 'विशेष' ह्या अर्थानेदेखील येतो. उदा. रोध-विरोध, वाद-विवाद, जय-विजय (शेष-विशेष देखील असेच). ह्याकरता काही नियम आहे का? जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
संस्कृतात उपसर्गामुळे मूळ धातूचा आणि साहजिकच धातूपासून झालेल्या शब्दाचा अर्थ बदलतो. प्रहार, आहार, संहार, विहार, प्रतिहार या सर्व शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत.
उपसर्गेण धात्वर्थो बलात्‌ अन्यत्र नीयते । प्रहाराहारसंहारविहारप्रतिहारवत् ।।
असे एकूण २० उपसर्ग आहेत. प्र, परा, अप, सम्‌, अनु, अव, वि, नि:, दुर्‌, अभि, अधि, सु, उद्‌, अति, नि, प्रति, परि, अपि, उप आणि आ.
धात्वर्थम्‌ बाधते कश्चित्‌ कश्चित्‌ तम्‌‌ अनुवर्तते । तमेव विशिनष्टि अन्य उपसर्गगतिः त्रिधा ।।
उपसर्ग तीन प्रकारे क्रिया करतात. त्यांनी अर्थ किंचित सुधारतो, अधिक तीव्र होतो तर कधीकधी पूर्णपणे बदलून जातो.
'वि' या उपसर्गाचे साधारणपणे पाच अर्थ: दूर जाणे(चलन-विचलन), वेगळे होणे(योग-वियोग), विरुद्ध होणे/बिघडणे(सर्जन-विसर्जन, कृती-विकृती), विशेष तीव्र होणे (शेष-विशेष), पूर्णपणे बदलणे (हार-विहार).
मुळात सृजन हा शब्द संस्कृतमध्ये नाही. कर्तन-वर्तनप्रमाणे सर्जन हेच शुद्ध रूप आहे. पण मराठीत सर्जन हे सृजनचे प्रयोजक रूप म्हणून वापरतात. त्यामुळे सृजन हा अस्सल मराठी शब्द आहे.
तज्ज्ञांचे उत्तर प्रे. चित्त (बुध., २४/०९/२००८ - ०६:४७).
सृजन - सर्जन यांपैकी कोणता शब्द बरोबर ?
निर्मिती (creation) या अर्थाने असलेला 'सर्जन' हा शब्द अलीकडे बरेचदा "सृजन' असा लिहिला-बोलला जातो. या दोन शब्दांपैकी कोणता शब्द बरोबर ही शंका कित्येकांच्या मनात असते. यांपैकी 'सर्जन' हा शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. मूळ धातू सृज्‌ (सकर्मक क्रियापद, सहावा गण, परस्मैपद. अर्थ : उत्पन्न करणे, निर्माण करणे.) सृज्‌ पासून सिद्ध झालेल्या सर्ज्‌ या आख्याताला प्रत्यय लागून त्याची रूपे सिद्ध होतात. उत्सर्जन, विसर्जन ही अशीच आपल्याला नित्य परिचयाची असलेली रूपे होत. (इथे सृज्‌ > सर्ज्‌ ला अनुक्रमे उत्‌ आणि वि हे उपसर्ग लागले आहेत.) तर्पण, आकर्षण, सर्प हे असे आणखी काही शब्द. हे शब्दही तृप्‌, आ + कृष्‌, सृ या धातूंपासून सिद्ध झालेले आहेत.
हे सर्व शब्द आपल्या भाषेत सुखाने रुळलेले असताना एकट्या "सर्जन' बद्दलच 'सृजन' की 'सर्जन' अशी शंका का यावी ? तर, मला वाटतं - (हे मात्र गमतीनं) इंग्रजीत शल्यविशारदासाठी "सर्जन' हा शब्द आहे. मराठीत आपण 'शल्यविशारद' न म्हणता सर्रास 'सर्जन'च म्हणतो. मग गल्लत नको म्हणून तर मूळ सर्जन (निर्मिती) शब्द 'सृजन' झाला नसेल ना - 'कृपण', 'पृथक'च्या धर्तीवर ?
माझ्या एका परिचितांच्या मुलाचं नाव त्यांनी ठेवलंय 'सृजन'. पण वास्तविक 'सर्जन' हा शब्द व्याकरणदृष्ट्या अचूक हे कळल्यावर ते म्हणाले, "अरे! आता काय करायचं? मी म्हणाले, "काही नाही. त्याला वैद्यकीय शाखेला जाऊ द्या. तो शल्यविशारद झाला की झालाच सर्जन.
विजया देव
निर्माण होणारा / करणारा प्रे. महेश (मंगळ., २९/०७/२००८ - ११:४१).
सृजन म्हणजे निर्मिती (होणे) म्हणून सृजनशील म्हणजे निर्माण होऊ शकेल असा/शी/से/से/श्या/शी
सर्जन म्हणजे निर्मिती (करणे) म्हणून सर्जनशील म्हणजे निर्माण करू शकेल असा/शी/से, निर्मिती करू शकतील असे/श्या/शी
म्हणून सृजनशील साहित्य आणि सर्जनशील लेखक/लेखिका असे असावे.
सृजनशील साहित्य आणि सर्जनशील लेखक/लेखिका हे मला वाटते, अगदी बरोबर.
परंतु विसर्जन म्हणजे सर्जनच्या विरुद्ध नाही. 'विसर्जन'चे संस्कृत अर्थ:- त्याग: दान; बाहेर टाकणे; निरोप देणे.
सर्जनच्या विरुद्ध (वि)नाश.

सर्जनशीलचे वाक्य उपयोग (गूगलवरून)[संपादन]

  1. देशाच्या वैज्ञानिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका निभावणारा आणि पुण्याला खरोखर पूर्वेचे "ऑक्‍सफर्ड' बनवू शकणारा "सर्जनशील संस्थांचा समूह' (इनोव्हेशन क्‍लस्टर) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) आवारात लवकरच विकसित होणार आहे.
  2. प्रतिभावान व सर्जनशील दिग्दर्शक म्हणून जब्बार पटेल यांची ओळख आहे.
  3. “डिस्कव्हरी ऑफ इंडिया'वर आधारित “तमसो मा ज्योतिर्गमय' हा प्रकल्पही त्यांच्या सर्जनशील प्रतिभेचा आविष्कार आहे.
  4. पुढच्या दिवाळीपर्यंत अनेक सर्जनशील व्यंगचित्रकारांना टॉवर चढाईमुळे नवा विषय मिळेल.
  5. या माहितीच्या युगात सर्जनशील व्यक्‍तींंचे रक्षण करण्यासाठी कायदे अपुरे आहेत, असे त्यांनी निकालात म्हटले.
  6. .सृजन व सर्जन या शब्दांच्या अर्थामध्ये काही भेद आहे काय? लेखक सृजनशील असतो की सर्जनशील?
  7. आपल्याकडे थोडीशी उपजत कल्पकता असेल, आपलं मन थोडं सर्जनशील असेल तर थोड्याशा प्रयत्नांनी आपल्याही गणपतीची सजावट मनाजोगती आकर्षक करता येईल.

सृजनशीलचे वाक्य उपयोग (गूगलवरून)

  1. 'सृजनशील आत्म्याचा उच्चार',
  2. काव्यनिर्मितीच्या आणि जीवननिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये, ज्याचा सृजनशील विवेक, रतीभरही ढळत नाही.
  3. पण या सृजनशील कुंभाराला वेडा कां म्हंटले आहे याचे कुतूहलही निर्माण होते.
  4. या प्रतिभासंपन्न आणि सृजनशील अभिनेत्याने हिंदी सिनेमातील नायकाच्या पारंपरिक चौकटीला
  5. आपण सृजनशील राहून इतरांनाही सृजनशील बनवणं, हे तेंडुलकरांचं मोठं योगदान आहे,
  6. तिने तिचा शेवटचा सृजनशील शब्द उच्चारला आहे, असेही नाही.
  7. स्त्री ही सर्व अर्थाने सृजनशील आहे; म्हणून नवी सृष्टी निर्माण क्षमतेचा दावा जे करतात, त्या साहित्यिकांनी स्त्रीची महती गायली पाहिजे, असे उपदेशिणारे निबंधच्या निबंध भावे .
  8. स्त्री-पुरुष नात्यासंबंधीचं आकर्षण मराठी नाट्यसृष्टीला नवं नाही. हे एक असं नातं आहे की, ज्याचा आवाज सृजनशील मनाला सतत ऐकू येत असतो.
  9. रेग्यांच्या कवितेत निसर्गचित्रांना स्त्रीप्रमाणे महत्त्वाचे स्थान आहे. कारण भुईदेखील स्त्रीसारखी सृजनशील आहे. ...
  10. हा लेख प्राधान्याने आणि इतर लेखही सृजनशील लेखननिर्मितीचा अभ्यासक्रम सुरू झालाच, तर त्याला उपयुक्त ठरावेत.
  11. या मजबूत परंपरेला आव्हान देणारी बंडखोरीही सृजनशील तर आहेच, पण चांगल्या अर्थानं आक्रमकही आहे. ...
  12. सृजनशील बुद्धिमंतांचा शोध 'एडिट इन्स्टिट्यूट'चा सप्टेंबरमध्ये सर्जनशील बुद्धिमंतांच्या शोधासाठी देशव्यापी कार्यक्रम चमकत्या बुद्धीच्या ...
  13. तेंडुलकर सर्जनशील, सृजनशील, चिंतनशील लेखक आहेत. त्यां
  14. . आज आपल्यासारखी चार गुणी, विद्वान, सर्जनशील, सृजनशील माणसं इथे येतात,
  15. ते सृजनशील, सर्जनशील, प्रतिभावंत, सात्विक, सभ्य आणि सुसंस्कृत मंडळींचं संकेतस्थळ आहे!
  16. परंतु सृजनशील, सर्जनशील शब्दप्रभूंनी शिव्यांत कल्पकता आणून शिव्यांचे भांडार समृद्ध केले पाहिजे असे आम्हाला वाटते. आणि तसे हळूहळू होईल याचीही आम्हाला खात्री आहे! ...

संदर्भ[संपादन]

  1. ^ काही भाषिक पेच

माझ्या मते,सृजन म्हणजे नैसर्गीक रीत्या निर्माण होणे व सर्जन म्हणजे यंत्र/मानव (वा इतर कोणत्याही प्रकारे) निर्मित.सृजन हा संस्कृत मुळ शब्द आहे. (स्+ऋ+ज्-जन्मती इति=सृजन) V.narsikar ०९:१०, १२ सप्टेंबर २००९ (UTC)