चर्चा:सखाराम महाराज

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

🙏जय हरी🙏 🚩श्री संत सखाराम महाराज संस्थान सखारामपूर🚩

श्री संत सखाराम महाराज मंदिर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील इलोरा (चावरा इलोरा ) या गावात बेंबडा नदीतीरी आहे .या गावला सखारामपूर असेही संबोधले जाते. या मंदिराची सर्व कार्यकारणी गुरुवर्य श्री ह भ प तुकाराम महाराज यांच्या कडे आहे. या संस्थान मध्ये अनेक गावांतील भक्तगण देवतांच्या सेवासंबंधी मार्गांचा अभ्यास करण्यासाठी कीर्तन,हरिपाठ ,काकडा मृदंग शिक्षण व बरेच काही ग्रहण करण्यासाठी येत असतात.

    संस्थानचे गौरक्षण सुद्धा आहे. त्यात 50 हून अधिक गौमता आहेत,

आणखी म्हणजे श्री संत सखाराम महाराज संस्थान मार्फत मंदिर समोरच सेमी इंग्रजी माध्यम शाळा आहे, 2 मजली इमारत , बस सुविधा ,शैक्षणिक कार्यक्रम ,शैक्षणिक सहली व इतरही कार्यक्रम होत असतात.

        या मंदिरात अनेक जयंती , पुण्यतीथी ,एकादशी , कीर्तन सोहळे साजरे केले जातात.

त्यांत दोन वार्षिक सोहळे मोठ्या उत्साहात संपन्न होत असतात. 1) श्री संत श्रीराम महाराज पुण्यतिथी आणी 2) श्री संत सखाराम महाराज पुण्यतिथी.

  संस्थान पंढरपूर कडेही पायी दिंडी घेऊन जात असते.
   या मंदिरात अनेक देवतांच्या सुंदर अशा प्रतिमा आहेत.सप्ते ,भागवत ,कीर्तन असे अनेक देव तल्लीन सोहळे कार्यक्रम येथे आयोजित होत असतात.

या मंदिराकडे जाण्यासाठी मडाखेड मार्गे 1 km, चावरा फाटा मार्गे 1km ,जळगाव जामोद हुन 13km इतके अंतर आहे. मी नितीन मोरखडे पाटील आपल्या सेवेत ही माहिती विस्तारित करित आहे,तरी कोणाला काही अधिक माहिती सुचवायची असेल तर मी नितीन रा. मोरखडे पाटील मला संपर्क करावा.

    🙏 ||  जय हरि  ||
         || राम कृष्ण हरी || 🙏