चर्चा:वृक्षमित्र (संस्था)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अग्रशीर्ष मजकूर[संपादन]

या पानाचे प्रयोजन

या पानावर देण्यात आलेली माहिती एका सामाजिक संस्थेची आहे. ह्या संस्थेचे आणि त्याचे संस्थापक मोहन हिराबाई हिरालाल यांचे पर्यावरण, वन आणि स्थानिक लोकशाही या विषयांवरील गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील काम जवळजवळ ४० वर्षे जुने आहे. पानावर देण्यात आलेल्या जोडण्या PDF files या सामाजिक संस्थेच्या प्रत्यक्ष कामातून तयार झाल्या आहेत.

मोहन हे जागतिक पातळीवर अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या Ashoka fellowship for Social Entrepreneurship च्या पहिल्या गटांतील मानकरी (१८८४) आहेत.

ह्या संस्थेच्या मेंढा-लेखा या स्थानिक लोकशाहीच्या अनोख्या प्रयोगाची महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात बरीच चर्चा आहे.

'वृक्षमित्र' या पानावर एक चौकट उभी करण्याचा माझा प्रयत्न आहे ज्यामध्ये अनेक जण भर घालून हे सर्व महत्वाचे विषय पुढे आणतील. त्यावर आवश्यक ते संदर्भ देखील पुढे येत राहतील.

माझा यापुढे मराठी विकिपीडियावर असाही प्रयत्न राहील की महाराष्ट्रातील इतर Ashoka fellows तसेच महत्वाच्या सामाजिक संस्थांची माहिती मराठी विकिपीडियावर आणायची.

उपरोक्त सही न केलेला संदेश बहुधा सदस्य:Anil Shaligram यांनी नोंदवला असावा. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:१२, २२ डिसेंबर २०१५ (IST)[reply]


आपण संवाद साधण्याकरता पुढाकार घेतल्या बद्दल धन्यवाद.विकिपीडिया नवीन संपादकांनी लेखनात पुढाकार घेण्याचे स्वागतच करते. मराठी विकिपीडिया एक ज्ञानकोश आहे. तो मुक्त असला तरी ज्ञानकोशीय परिघाच्या कक्षेत मर्यादेत काम करतो. या कक्षा अभ्यस्त होण्या करता वेळ लागेल हे समजण्या सारखे आहे. काही महत्वाचे मुद्दे खाली नमुद करत आहे.
१) ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांच्या बद्दल ज्ञानकोशीय परीघाच्या मर्यादेत दखल घेता येते.
२) अर्थात अशा ज्ञानकोशीय दखल घेण्यात व्यक्ती किंवा संस्थेस जाणीवपुर्वक प्रोमोट करणे/जाहीरात करणे असा उद्देश असू नये.त्यामुळे ज्ञानकोशीय माध्यम संस्थेची आवाहने सेवांची अथवा आगामी कार्यक्रमांची उद्घोषणा जाहीरात, संस्था/व्यक्तीचे संपर्क पत्ते,फोन,इमेल नंबर इत्यादी देण्या करता वापरू नये.संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाचे नाव उपलब्ध असल्यास त्याची दखल घेता येते.अर्थात विकिपीडिया लेख तुमच्या संस्थेचे खासगी संकेतस्थळ म्हणून वापरता येत नाही.
२) व्यक्ती आणि संस्था एकमेकांशी निगडीत असल्या तरी स्वतंत्र एंटिटी असल्या मुळे उल्लेखनीयता तपासली जाताना दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी समजल्या जातात. उपरोक्त चर्चेतील व्यक्ती मोहन हिराबाई हिरालाल यांची उल्लेखनीयता संभवनीय आहे.(त्यांच्या बद्दल वेगळा लेख लिहावा)
३) वृक्षमित्र (संस्था) ची संस्था म्हणून ज्ञानकोशीय उल्लेखनीयता अजून उमगलेली नाही. सध्या लेखात व्यक्ती आणि संस्थेच्या कार्याची सरमिसळ झाल्याची शकयता वाटते. संस्थेची ज्ञानकोशीय दखल पात्रता वेगळी तपासावयास हवी संस्था नेमकी केव्हा अस्तीत्वात आली ,केवळ संस्थेच्या नावावर असलेले कार्य कोणते आणि संस्थेस ज्ञानकोशीय दखलपात्रता का आहे हे वेगळे नमुद करावे.
४) सर्वात मह्त्वाचे कॉपी पेस्टींग टाळावे, मराठीत आणि परिच्छेद लेखन करावे ( विश्वकोशीय उल्लेखनीयता किमान दोन परिच्छेद मजकुर होईल हे पहावे).
धन्यवाद

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:३१, २७ सप्टेंबर २०१३ (IST)[reply]

माझी अशी सूचना आहे की शीर्षक 'वृक्षमित्र (संस्था)' असे न देता 'वृक्षमित्र (सामाजिक संस्था)' असे द्यावे. शीर्षकाचा बदल मला संपादित करता येत नसल्याने बहुदा तुम्हाला (माहीतगार) करावा लागेल.

उपरोक्त सही न केलेला संदेश बहुधा सदस्य:Anil Shaligram यांनी नोंदवला असावा. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:१२, २२ डिसेंबर २०१५ (IST)[reply]
मराठी विकिपीडियासंबंधी निरीक्षण:[संपादन]

पुढील मजकुरासाठी ही जागा योग्य आहे की नाही ठाऊक नाही. पण या लेखासाठी श्री. माहितगार यांनी जी तत्परता दाखवली आणि ज्या सूचना, मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष काम केले तो माझ्यासाठी एक सुखद धक्का होता. जर हा अपवाद नसेल आणि मराठी विकिपीडियाचे हे culture असेल तर मराठी विकिपीडियाला उज्वल भविष्य आहे असे मला वाटते.

यावरून आणखी एक मुद्दा पुढे येतो, तो म्हणजे खाजगी क्षेत्रापेक्षाही सामाजिक क्षेत्रात work efficiency जास्त असू शकते, जर तशी रचना आणि स्वातंत्र्य असेल तर, हे देखील सिद्ध होते. सामाजिक स्वयंसेवेच्या यशस्वी model हे उदाहरण ठरावे.

मराठी विकिपीडियाकडे आजवर मराठी समाजाने दुर्लक्ष केले आहे. ही स्थिती लौकर बदलायला हवी कारण त्यातच महाराष्ट्राची प्रगती दडली आहे.

उपरोक्त सही न केलेला संदेश बहुधा सदस्य:Anil Shaligram यांनी नोंदवला असावा. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:१२, २२ डिसेंबर २०१५ (IST)[reply]