चर्चा:बौद्ध धर्माचा उदय व विकास

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२) गौतम बुद्धाचे जीवनचरित्र:- बुद्धाचे जीवनवृत्त सर्वांच्या परिचयाचे आहे. नेपाळच्या दक्षिण सरहद्दीवर असलेल्या रोहिणी नदीच्या काठी कपिलवस्तू नावाचे शहर होते. तेथे शाक्य घरान्याच्या शुद्धीदोन नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या राणीचे नाव महामाया. त्याना जो पुत्र झाला ( इ.स.पूर्व५६७ ) त्याचे नाव सिद्धार्ध. याचा जन्म झाल्यानंतर यांची आई महामाया सातव्या दिवशी वारली. नंतर तिची बहिण गौतमी हिने त्याचे पालन केले. म्हणून त्याचे नाव गौतम . गौतमी हि त्याची सावत्र आईहि होती. बालपणापासूनच सिद्धार्ध काहीसा विरक्त होता. या विरिक्त मुलाकडे पाहून त्याच्या आई बापाला अत्यंत दुख: होत असे. त्यामुळे त्यांनी सिद्धार्धला अतिशय लाडात वाढविले. त्याच्यासाठी सर्व सोयीनी युक्त असा एक सुंदर राजवाडा बांधून देण्यात आलाव तेथे कोणत्याही प्रकारची दु:ख त्याच्याजवळ येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली. यशोधरा नामक सुंदरी राजकन्येशी त्यांचा विवाह झाला. पुढे त्याना मुलगा झाला त्याचे नाव राहुल वयाच्या २८ व्या वर्षापर्यंत सिद्धार्थ याप्रमाणे सुखोपभोगात जीवन घालवीत होता.