चर्चा:प्रभाकर निलेगावकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रभाकर निलेगावकर या शीर्षकाचा लेख बनवू नये, अशी सूचना वाचायला मिळाली. नमूद केलेले कारण - ’हे शीर्षक ब्लॉक केलेले आहे.’ कारण?

प्रकार निलेगावकर हे मराठीतले एकपात्री कार्यक्रम करणारे एक कलावंत आहेत. इ.स. १९९१ सालापासून त्यांचे कार्यक्रम रंगमंचावर येत असतात. त्यांना २०१३ सालापर्यंत ४८ व्यक्तिरेखा सादर केल्या आहेत. स्वतिश्री निर्मित ’अस्सल माणसं इरसाल नमुने’ ह्या त्यांच्या एकपात्री कार्यक्रमाची वाटचाल २००० प्रयोगांकडे चालली आहे.

प्रभाकर निलेगावकर यांना महाराष्ट्र शासनाचा गौरव पुरस्कार, रोटरी क्लबचे मिलेनियम ॲवॉर्ड, कर्नाटकाचा सरस्वती पुरस्कार, आणि अखिल मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार इ.इ. प्रदान झाले आहेत....J (चर्चा) १९:०४, ११ मार्च २०१३ (IST)[reply]

मलाही
तुम्हाला पाने तयार करा ची परवानगी नाही, खालील कारणासाठी:
"प्रभाकर निलेगावकर" या शीर्षकाचा लेख बनवू शकत नाही.
अशीच सूचना मिळाली. बहुतेक माझी कालपर्यंत फक्त दहा संपादने झाली आहेत त्यामुळे असेल कदाचित. विकिपीडियाकडे तांत्रिक पार्श्वभूमी असलेलीही तज्ञ माणसे आहेत हे पाहून समाधान वाटले. --संतोष दहिवळ (चर्चा) १९:५०, ११ मार्च २०१३ (IST)[reply]