ग्राम रोजगार सेवक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रामपंचायत स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (महाराष्ट्र)चे अभिलेख व नोंदवह्या ठेवल्या जातात. या कामाची जबाबदारी ग्रामपंचायतीची म्हणजेच सरपंचग्रामसेवक यांची आहे. या कामात ग्रामसेवकांना मदत करण्यासाठी व संगणकीय माहिती इ. भरण्यासाठी मदतनीस म्हणून ग्राम रोजगार सेवकांच्या सेवा बाह्यस्थ (outsourcing) पद्धतीने घेतल्या जातात.

  • वेतन :- दरमहा १२००० रुपये ग्रामरोजगार सेवकांना ग्रामनिधी मधून दिले जाते.
  • पदोन्नती :- ग्रामरोजगार सेवकांना ग्रामसेवक या पदावर पदोन्नती दिली जाते.

कामाचे स्वरूप[संपादन]

अ) ग्राम रोजगार सेवकाचे काम हे अर्धवेळ स्वरूपाचे असेल.

ब) ग्राम रोजगार सेवक पदाच्या मानधनातून त्याची किंवा त्याच्या कुटुंबाची उपजीविका चाले, अशी अपेक्षा त्याने धरू नये. ग्राम रोजगार सेवकाचे उत्पन्नाचे अन्य मार्ग असल्यास ते करून ग्राम रोजगार सेवक पदाचे काम करण्यास मुभा असते. ग्राम रोजगार सेवक पदाचे हे मानधन त्याचे अधिकचे उत्पन्न असेल.

क) ग्रामपंचायतीचे पदाधिकारी बदलले तरी ग्राम रोजगार सेवक बदलू नये.

ड) सबळ कारणावरून ग्राम रोजगार सेवकाला काढून टाकण्यापूर्वी त्याला नैसर्गिक न्यायानुसार ग्रामसभेत त्याचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी आणि त्याबाबत ग्राम सेवकाचे अभिप्राय घ्यावेत.

इ) गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) किंवा तत्सम अधिकारी यांनी त्यांना नियुक्तीचे आदेश देऊ नयेत.

शैक्षणिक अर्हता व इतर आवश्यकता[संपादन]

मराग्रारोहयांचे अभिलेख ठेवणे व ग्राम रोजगार सेवकांना मदत करणे हे ग्राम रोजगार सेवकाचे काम असल्याने तो किमान दहावी पास असावा. (१२ वी पास असलेल्यास प्राधान्य राहील.)

अ) जर दहावी पास नसलेल्या उमेदवाराची नियुक्ती पुर्वी करण्यांत आलेली असेल तर त्याची नियुक्ती पुढे चालू ठेवण्यास हरकत नाही.

ब) त्याला वेबसाईटवर ग्रामपंचायत क्षेत्रातील राम्रारोहयोच्या कामाची माहिती भरण्याचे काम करावयाचे असल्याने पुढील ६ महिन्यामध्ये त्याने MS-CIT किंवा तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. गटविकास अधिकारी लेखी कारणे नमूद करून फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये सदर कालावधी पुढील ६ महिनेपर्यंत वाढवू शकेल. अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल.

क) भविष्यात त्याच्या कामाच्या संदर्भात काही चाचण्या किंवा परीक्षा घेण्यांत येतील. जर या परीक्षांमध्ये तो पास झाला नाही तर त्याला कामावरून कमी करण्यास तो पात्र राहील.

नियुक्तीच्या संदर्भात इतर अटी[संपादन]

अ) उमेदवाराचे चारित्र्य निष्कलंक असावे, तसेच गांवकऱ्यांचे त्याच्याबद्दल मत चांगले असावे व त्यांची ही परीक्षा न घेता ग्रामसभेत लोकांची सहमती घेऊन निवड करावी.

ब) उत्तम आरोग्य असावे.

क) गावातील अंगमेहनतीचे काम करण्यास सक्षम असलेल्या प्रौढ व्यक्तिंना विशेषतः महिला, अनुसूचित जाती / जमातीच्या व अन्य तत्सम प्रवर्गातील ग्रामस्थांना ज्यांच्यामधून मुख्यतः मजूर उपलब्ध होणार असतात त्यांना संवेदनशिलतेने व व्यवस्थित हाताळण्याची क्षमता असावी.

कर्तव्य[संपादन]

  1. मग्रारोहयोच्या संदर्भातील ग्रामपंचायत पातळीवर सर्व प्रकारचे अभिलेख तयार करणे व तो जतन करण्यासाठी ग्राम सेवकाला मदत करणे.
  2. त्याने ग्राम सेवकाच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या नोंदी घ्याव्यात. तथापि सर्व अभिलेख योग्य प्रकारे व्यवस्थितपणे व परिपूर्ण ठेवण्याची जबाबदारी ग्राम सेवकाची असेल.
  3. ग्राम सेवकाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीमध्ये सर्व अभिलेख सांभाळण्याचे काम ग्राम रोजगार सेवकाने करावे.
  4. भविष्यात मजूरांच्या हजेरीसाठी वापरावयाची यांत्रिक व इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळण्याची क्षमता व तयारी असावी.
  5. मजुरांचे हजेरीपत्रक सांभाळा.
  6. रोजगार कार्यक्रम गांवात सुरळीतपणे व सुनियोजितपणे राबविण्यासाठी व यशस्वी करण्यासाठी ग्राम सेवकाच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी प्रयत्न करावेत.
  7. मोजमाप घेण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांना व तत्सम तांत्रिक अधिकाऱ्यांना मदत करणे, व शासनाच्या आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना रोजगार कार्यक्रमा संदर्भात सहाय्य करणे.
  8. आवश्यकता भासल्यास मस्टर रोल गट विकास अधिकारी कार्यालयात घेऊन जाणे व
  9. बैंक आणि पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून मजूरांच्या मजूरी प्रदानास विलंब होणार नाही याबाबत दक्ष रहाणे.

गैरवर्तणूक[संपादन]

  1. मग्रारोहयोच्या अभिलेखाची नीट काळजी न घेणे व चांगल्या प्रकारे काम न करणे
  2. भ्रष्टाचार व खोट्या हजेरी पत्रकाबाबत तक्रारी आल्यास त्या गैरवर्तणुकीशी संबंधित समजण्यात येतील.
  3. मजुरांना वाईट वागणूक देणे.
  4. मजुर व विशेषतः महिला मजुर यांचेशी गैरवर्तणुकीच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्यास मानधनात कपात करण्यापासून कामावरून निष्कासित करण्यापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

संख्या[संपादन]

एका ग्रामपंचायतीमध्ये ग्राम रोजगार सेवकांची संख्या शक्यतो एका ग्रामपंचायतीमध्ये एक ग्राम रोजगार सेवक असावा. तथापि ग्रामपंचायत असल्यास किंवा ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामे असल्यास किंवा आदिवासी व भाग असल्यास किंवा जेथे ग्रामपंचायतीमध्ये जास्त गांवे विखुरलेल्या स्वरूपात असती एकापेक्षा जास्त ग्राम रोजगार सेवक घेता येतील.

प्रदाने[संपादन]

  1. ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या मजुरीच्या प्रदानावर वेळोवेळी निश्चित केलेल्या दराने मानधन.
  2. सदर मानधन ६% प्रशासकीय खर्चाच्या निधीमधून देण्यांत येईल.
  3. गट विकास अधिकाऱ्यांकडून शक्यतो दर पंधरा दिवसांनी मानधन अदा करण्यांत येईल. परंतु १ महिन्यापेक्षा जास्त कालावधीत प्रदाने करू नयेत.
  4. गट विकास अधिकारी कार्यालयात जाण्यासाठी किंवा ग्राम सेवकांच्या सूचनेप्रमाणे प्रवास करण्यासाठी केलेल्या खर्चाची तसेच अन्य तत्सम खर्चाची देयके ६% प्रशासकीय खर्चाच्या निधीमधून अदा करण्यांत येतील.

संदर्भ व नोंदी[संपादन]