केंद्रीय उत्पाद व सीमा शुल्क मंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सीमा शुल्क व केंद्रीय उत्पाद
ब्रीदवाक्य देशसेवार्थ करसंचय
स्थापना २६ जानेवारी १९४४
संस्थापक भारत सरकार
मुख्यालय नवी दिल्ली, भारत
संकेतस्थळ http://www.cbec.gov.in


केंद्रीय उत्पाद व सीमा शुल्क मंडळ ही भारतातील सीमाशुल्क, केंद्रीय अबकारी शुल्क व सेवा कर यावर नियंत्रण ठेवणारी मध्यवर्ती यंत्रणा आहे. भारतातील सीमा शुल्क संबंधित कायद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच महसूल गोळा करण्यासाठी इ.स. १८८५मध्ये तेव्हाच्या इंग्रज गव्हर्नरने सीमा शुल्क व केंद्रीय अबकारी विभागाची स्थापना केली. हा विभाग भारताच्या सर्वात जुन्या सरकारी विभागांपैकी एक आहे.

सध्या हा विभाग अर्थ मंत्रालयातील राजस्व (महसूल) विभागाच्या अखत्यारीत येतो.

प्रभाग[संपादन]

  • केंद्रीय अबकारी शुल्क
  • सीमा शुल्क
  • सेवा कर

पोट प्रभाग[संपादन]

  • महसूल गुप्तवार्ता संचालनालय
  • केंद्रीय उत्पादन गुप्तवार्ता संचालनालय
  • आर्थिक गुप्तवार्ता एकक
  • सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पादन परीक्षण संचालनालय
  • राष्ट्रीय सीमाशुल्क, उत्पाद आणि नार्कोटिक्स अकादमी
  • केंद्रीय आर्थिक गुप्तवार्ता केंद्र
  • लेखापरीक्षण संचालनालय
  • निर्यात विकास संचालनालय
  • सीमा शुल्क, अबकारी शुल्क व सेवा कर अपील न्यायाधीकरण
  • सेवा कर संचालनालय
  • आर्थिक गुप्तवार्ता परिषद
  • अंमलबजावणी संचालनालय
  • केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरो

अधिकार श्रेणी[संपादन]

  • अध्यक्ष
  • मुख्य आयुक्त
  • आयुक्त
  • अतिरिक्त आयुक्त
  • उपायुक्त
  • सहाय्यक आयुक्त
  • अधीक्षक
  • निरीक्षक
  • उप निरीक्षक
  • कर सहाय्यक
  • हवालदार