काळू नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


काळू ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. हिचा उगम अहमदनगर व पुणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या कळसुबाई वन्य जीव अभयारण्यात (प्रशासकीय दृष्टया अहमदनगर जिह्यात) पुणे जिल्ह्यातील पिंपळगाव जोगा धरणाजवळ खिरेश्वर येथे टोलार खिंडीमध्ये होतो. ह्या नदीने प्रवरा नदीच्या शीर्ष प्रवाहांचे अपहरण केलं आहे.त्यामुळे सह्याद्रीत पडणाऱ्या पावसाचं पाणी दुष्काळ ग्रस्त अहमदनगर जिल्ह्याला व मराठवाड्याला मिळत नाही. कोकणात भरपूर, मुबलक पाणी असून, हे सर्व पाणी समुद्रातच वाहून जाते. हिला दोन उपनद्या आहेत सरळगाव संगम येथे डोईफोडी येऊन मिळते तर टिटवाळा आणि आंबिवलीच्या मध्ये भातसा नदीला येऊन मिळते व पूढे चार-पाच किलोमीटर अंतरावर अटाळी या गावी उल्हास नदीस मिळते त्यानंतर ती वसईच्या खाडीत मिळते.या नदीला समुद्राच्या भरतीचे पाणी वसईच्या खाडीतुन येऊन टिटवाळा येथे पर्यंत यायचे कदाचित म्हणूनच बरोबर काळू नदी व समुद्र प्रथमच मिळतात अशा ठिकाणी पूर्वी कण्व ऋषींनी आपला आश्रम बांधला असावा आणि तेथेच टिटवाळ्यातील प्रसिद्ध गणपती मंदिर स्थापन केले. नदीवरील सावर्ने माळशेजघाट येथिल धबधबा प्रसिद्ध आहे.