एव्हो मोरालेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एव्हो मोरालेस

बोलिव्हियाचा ८०वा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२२ जानेवारी २००६
मागील एदुआर्दो रॉद्रिग्वेझ

जन्म २५ ऑक्टोबर, १९५९ (1959-10-25) (वय: ६४)
ओरिनोका, बोलिव्हिया
सही एव्हो मोरालेसयांची सही

हुआन एव्हो मोरालेस आय्मा (स्पॅनिश: Juan Evo Morales Ayma; २६ ऑक्टोबर १९५९) हा दक्षिण अमेरिकेमधील बोलिव्हिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २००६ साली सत्तेवर आलेला मोरालेस अनेक इतिहासकारांच्या मते लोकशाही मार्गाने निवडून आलेला व स्थानिक आदिवासी वंशाचा असलेला बोलिव्हियाचा पहिलाच राष्ट्राध्यक्ष मानला जातो. मोरालेसने सत्तेवर आल्यानंतर बोलिव्हियामध्ये अनेक आर्थिक सुधारणा हाती घेतल्या व देशाची धोरणे समाजवादी विचारांच्या दिशेने वळवली. लॅटिन अमेरिकेमध्ये अमेरिकेच्या वाढत्या हस्तक्षेपाला मोरालेसचा तीव्र विरोध आहे.

मोरालेस बोलिव्हियामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. २००९ व २०१४ सालच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये तो प्रचंड बहुमताने विजयी झाला आहे. त्याच्या प्रशासनाने बोलिव्हियामधील गरिबी व निरक्षरता मोठ्या प्रमाणावर कमी केली आहे. परंतु जागतिक स्तरावर वादग्रस्त नेता मानला जातो. अनेक साम्यवादी टीकाकारांच्या मते मोरालेसला बोलिव्हियाची अर्थव्यवस्था संपूर्णपणे साम्यवादी स्वरूपाची करण्यात अपयश आले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: