उंदीरकानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही पाणथळ जागी उगवते. हिची पाने उंदराच्या कानाप्रमाणे असतात म्हणून हिला हे नांव पडले आहे.

|चित्र शीर्नी


उंदीरकानी : (हिं. मुसकानी गु. उंदरकानी सं. मूषककर्णी लॅ. आयपोमिया रेनिफॉर्मिस, कुल-कॉन्व्हॉव्ल्ह्युलेसी). जमिनीवर पसरत वाढणाऱ्या या ओषधीय [→ ओषधि] वेलीचा प्रसार भारत (बंगाल, प. द्वीपकल्प), श्रीलंका, आग्‍नेय व उत्तर आफ्रिका इ. भागांत असून ती बहुधा पाणथळ जागी आढळते. हिच्या अनेक केसाळ फांद्यांपासून निघालेली आगंतुक मुळे जमिनीत जातात. पाने साधी, मूत्रपिंडाकृती व उंदराच्या कानासारखी खोलगट, हृदयाकृती व दातेरी फुले पानांच्या बगलेत, पिवळी, एकाकी (एकेकटी) किंवा दोन-तीन एकत्र अशी सप्टेंबर–ऑक्टोबरात येतात. हिची गोलसर व लवदार बोंडे केसाळ संवर्ताने (फुलाच्या सर्वांत बाहेरील हिरवट मंडलाने) वेढलेली असून बी पिंगट असते. ही वनस्पती शरीरातील अवयवांच्या कार्यांतील अडथळे दूर करणारी, मूत्रल (लघवी साफ करणारी), त्वचादोषनाशक, आरोग्य पुनःस्थापक असून संधिवातावर व तंत्रिका शूलावर (मज्‍जातंतूच्या मार्गात अधूनमधून होणाऱ्या तीव्र वेदनेवर) गुणकारी असते. ⇨ अनंतमुळाबरोबर तयार केलेला हिचा फांट (काढा) सारक असतो.

हे सुद्धा पहा[संपादन]