इकीया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इकीया

इकीया [१] (इंग्रजी उच्चार: आयकिया; मराठी लेखनभेद: इकीआ ; स्वीडिश: IKEA) ही आंतरराष्ट्रीय गृहोत्पादनांची व फर्निचर उत्पादनांची निर्मिती व विक्री करणारी खासगी रीटेल कंपनी आहे. ही कंपनी जगातील सर्वांत मोठी फर्निचर ‍रीटेल कंपनी आहे [२].

इंग्वार कांप्राद या १७ वर्षीय स्वीडिश तरुणाने इ.स. १९४३ साली ही कंपनी स्थापली. त्याच्या नावाच्या "आय", "के" या आद्याक्षरांसह तो जेथे वाढला त्या "एल्मटारिड" या वाडीच्या नावातील "ई", व ती वाडी ज्या प्रांतात आहे त्या "आगुन्नारिड" प्रांताच्या नावातील "ए" या आद्याक्षरांतून बनवलेले "इकीया" हे नाव कंपनीस देण्यात आले [३].

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. इकीया - स्वीडिश भाषेतील उच्चार. फॉर्वो.कॉम. (स्वीडिश व अनेक भाषी मजकूर)
  2. "इकीया मल्स जोइंट व्हेंचर विथ बॉस्निया फर्निचर मेकर", रॉयटर्स, ८ जानेवारी, इ.स. २००८. २६ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी तपासले. (इंग्लिश मजकूर) 
  3. (इ.स. १९९६) इंग्वार कांप्राद अँड इकीया. हार्वर्ड बिझनेस स्कूल पब्लिशिंग, बॉस्टन. (इंग्लिश मजकूर) 

बाह्य दुवे[संपादन]



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.