आगमसार
Appearance
संत कवी हंसराजस्वामी कृत एकूण ३५२६ ओव्यांचा ग्रंथ, यात त्यांनी संवादरूपाने उपनिषदांचे सार सिद्धांत स्वरूपात मांडले. या ग्रंथाचे एकूण २ भाग आहेत उत्तरार्ध आणि पूर्वार्ध. उत्तरार्धात आणि पूर्वार्धात एकूण ७-७ पंचिका आहेत. एका पंचीकेत ५-५ समास आहेत प्रत्येक समास हा स्वतंत्र आहे. पूर्वार्धात सांख्य विचारांचे प्रतिपादन केलेले आहे तर उत्तरार्धात शंकराचार्यांच्या अपरोक्षानुभूतीतून जी ध्यानाची १५ अंगे सांगितली गेली त्यांचा अनुवाद केला आहे.