अष्टांगहृदय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अष्टांगहृदय हा आयुर्वेदाचा एक संहिताग्रंथ असून बृहद्त्रयींपैकी, अर्थात तीन मोठ्या ग्रंथांपैकी, एक आहे. आचार्य वाग्भट हे या संहितेचे लेखक आहेत. बृहद्त्रयींतले बाकीचे दोन ग्रंथ म्हणजे चरक संहितासुश्रुत संहिता. पुढील काळात वृद्धवाग्भट नामक दुसऱ्या एका वैद्यांनी अष्टांगहृदय या ग्रंथात काही भर घालून अष्टांगसंग्रहनामक अलंकारित पद्यात्मक स्वरूपाचा ग्रंथ निर्माण केला.

अष्टांगहृदय या ग्रंथात औषधोपचार आणि शस्त्रक्रिया हे दोन्ही विषयांचा समावेश आहे.
Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.