अकाली
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे. |
| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी. |
‘अकाल’ म्हणजे कालरहित वा ज्याच्यावर कालाची सत्ता चालत नाही , जो भूत, भविष्य , वर्तमान यापलीकडे असतो, तो , म्हणजे परमेश्वर. ह्या अकालपुरुष परमेश्वरात रममाण होणारे, त्याची उपासना करणारे , त्यांना ‘अकाली’ म्हटले गेले.. शिख धर्मात हा शब्द विशेष महत्त्वाचा आहे. गुरु गोविंदसिंह यांनी स्थापना केलेल्या खालसा पंथ चे अनुयायी अकाली म्हणूनच ओळखले जातात.
औरंगजेबाच्या अत्याचारांच्या विरोधात अकालींनी संघटित होऊन आपल्या दलाची उभारणी केली ‘सत् श्री अकाल’ ही त्यांची रणगर्जना होती. अकाली सेनेची एक शाखा सरदार मानसिंह याच्या नेतृत्वाखाली निहंग या नावाने प्रसिद्ध झाली. निहंग लोक अविवाहित राहून साधुवृत्ति धारण करून रहातात.
अधिक वाचन [संपादन]
- मराठी विश्वकोश : भाग १