Jump to content

विकिपीडिया:ल आणि ळ चा फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ल आणि ळ ही दोन स्वतंत्र अक्षरे.

या दोन अक्षरांचे उच्चार जवळपास पूर्ण मिळते जुळते.

त्यामुळे अनेकदा ळ चा उच्चार काही लोक सहजपणे ल सारखा पण ल नाही,  ल व ळ च्या मधला करतात. तर काही वेळेस ल करतात.

ल हा उच्चार जगातील सर्व भाषांमधे आहे.

पण ळ हा उच्चार भारताबाहेर फक्त  नेपाळमधे आहे, बाकी जगात कोठेही नाही.

भारतातदेखील ळ हा उच्चार सर्वत्र नाही.

संस्कृत मधे सध्या ळ नाही.

हिंदी, बंगाली, आसामी मधे ळ नाही.

सिंधी, गुजराती मधे ळ आहे,पण माझ्या अंदाजानुसार फारसा वापरात नाही.

मराठी व दक्षिण भारतातील सर्व भाषात ळ आहे व वापर भरपूर आहे.

ल व ळ च्या उच्चारातील सारखेपणा मुळे ळ च्या ऐवजी ल बोलले लिहिले तर कुठे बिघडते असे अनेकांना वाटत असेल कदाचित.

हिंदीत कमल व मराठीत कमळ 

ल काय , ळ काय..

काय फरक पडला?

पण कसे मराठीत होत नाही.

ल की ळ यावरून अर्थात फरक पडतो.

काही शब्द पाहू.

अंमल - राजवट

अंमळ - थोडा वेळ

वेळ  time

वेल- झाड, सायलीचा वेल वगैरे

खल- गुप्त चर्चा किंवा

खल बत्ता मधील खल

खळ- गोंद

पाळ - कानाची पाळ

पाल -. सरडा, पाल वगैरे

नाल.- घोड्याच्या बैलांच्या खुरांना मारतात ती धातूची पट्टी

नाळ - बाळ आईच्या पोटात असताना अन्न पुरवठा वगैरे करणारा बेंबीशी संबंधीत अवयव

कल - निवडणूकीचा कल, झुकाव

कळ - वेदना,पोटातील कळ

किंवा यंत्राचे बटण

लाल - लाल रंग

लाळ - थुंकी

ओल - पावसात भिंतीला येणारा ओलसरपणा

ओळ - रेघ

मल - शौच

मळ - कानातला, त्वचेचा मळ यापासून गणपती झाला.

माल - सामान

माळ - मण्यांची माळ, हार

चाल - चालण्याची ढब 

त्याची चाल ऐटदार आहे वगैरे

चाळ -  नर्तकीच्या पायातील घुंगरांचा दागिना

दल.- राजकीय पक्ष, संघटना

जनता दल

पुरोगामी लोकशाही दल

दळ - भाजी अथवा फळाचा गर

वांग्याचे दळ वगैरे

छल.- कपट

छळ - त्रास

काल - yesterday 

काळ - कालखंड वगैरे, मृत्यु

गलका - ओरडा आरडा

गळका - पाण्याचा पाईप लिकेज असणे वगैरे

तरी आपली भाषा जपा

इंग्रजी, हिंदीचे आक्रमण रोखा.

इंग्रजी, हिंदीच्या नादी लागून थाळीला थाली म्हणू नका.

खाली म्हणजे वरतीच्या विरुद्ध under, down,

हिंदीत.खाली म्हणजे रिकामे

मराठीत गाडी रिकामी होते

खाली होत नाही.

नाहीतर ल किंवा तपमान प्रमाणे

ळ ऐवजी व वापरा असा सरकारी फतवा येईल.

ळ जपा

मराठीचे सौंदर्य जपा