हिंदूइझम इन पब्लिक अँड प्रायव्हेट (पुस्तक)
हिंदूइझम इन पब्लिक अँड प्रायव्हेट : रिफॉर्म, हिंदुत्व, जेंडर अँड संप्रदाय हे पुस्तक अंथनी कोपले यांनी संपादित केलेले असून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने २००३ मध्ये प्रकाशित केले आहे.[१] पुस्तकातील सर्व लेख हे २००० सालच्या सप्टेंबरमध्ये एडिनबरो येथे झालेल्या 'युरोपियन कॉन्फरन्स ऑफ मॉर्डन साउथ एशियन स्टडीज'[२] मधील धार्मिक सुधारणावादी चळवळींवरील एका पॅनल समोर सादर करण्यात आलेले होते.
महत्त्वाचे मुद्दे
[संपादन]या पुस्तकात संपादक भारतातील १९व्या व २०व्या शतकातील धार्मिक सुधारणावादी चळवळींनी स्वीकारलेले राष्ट्रवादाचे व आधुनिकतेचे स्वरूप व त्याचे समकालीन हिंदुत्वाशी असलेल्या संबंधांचे परीक्षण केले आहे. ज्या विचारसरणीला नंतरच्या काळात हिंदुत्व असे संबोधण्यात आले, त्या हिंदुत्वाच्या उदयाला कारणीभूत झालेल्या विवेकानंद, योगी अरविंद आणि दयानंद सरस्वती यांच्या प्रभावाचे चिकित्सात्मक विश्लेषण या पुस्तकातील लेखांमध्ये केलेले आहे.[३]
टीका
[संपादन]अरविंद शर्मा यांच्या मते हे पुस्तक काही मूलभूत गृहीतकांना आव्हान करते. अमिया सेन यांनी या पुस्तकामधील युक्तिवादाची तीव्रता, वापरण्यात आलेल्या साधनांची समृद्धता व सैद्धांतिक प्रश्नांची व्याप्ती यांसाठी पुस्तकाची स्तुती केलेली आहे.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ Copley, Antony R. H. (2003). Hinduism in Public and Private: Reform, Hindutva, Gender, and Sampraday (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 9780195663938.
- ^ "संग्रहित प्रत". 2016-03-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-09-12 रोजी पाहिले.
- ^ Sharma, Arvind (2010). Hindu Narratives on Human Rights (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. p. 78. ISBN 9780313381614.
- ^ "Debates on Religion". Economic and Political Weekly (इंग्रजी भाषेत): 7–8. 2015-06-05.