सेबु पॅसिफिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सेबु पॅसिफिक एर या पानावरून पुनर्निर्देशित)

सेबु पॅसिफिक एर ही फिलिपिन्समधील विमानवाहतूक कंपनी आहे. मनिलामध्ये मुख्यालय असलेल्या या कंपनीचा मुख्य तळ निनॉय ॲक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे असून इतर तळ माक्तान-सेबु आंतरराष्ट्रीय विमानतळ, क्लार्क आंतरराष्ट्रीय विमानतळ, फ्रांसिस्को बँगोय आंतरराष्ट्रीय विमानतळ, इलोइलो आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कालिबो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहेत.