Jump to content

वॉर्ड कनिंगहॅम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वॉर्ड कनिंगहॅम ऊर्फ हॉवर्ड जी. वार्ड कनिंगहॅम (जन्म : २६ मे १९४९; हयात...) हे अमेरिकन संगणक कार्यप्रणालीचे निर्माते असून त्यांनी पहिला विकी विकसित केला. या अर्थाने ते विकिपीडियाचे जनक आहेत.

वार्ड कनिंगहॅम, विकीचे जनक, डिसेंबर २०११ मधील चित्र

कनिंगहॅम हे (एक्सपी) (XP) या नावाने प्रसिद्ध असलेली एक्स्ट्रीम प्रोग्रॅमिंग (Extreme Programming) ही सॉफ्टवेर विकास कार्यप्रणाली आणि डिझाईन पॅटर्न यांचे आद्यप्रवर्तक मानले जातात. कनिंगहॅम यांनी १९९४ मध्ये "विकीविकीवेब" या सॉफ्टवेरची निर्मिती सुरू केली आणि २५ मार्च १९९५ रोजी त्यांनी कनिंगहॅम अँड कनिंगहॅम (जे सामान्यतः c2.com या नावाने ओळखले जाते) या सॉफ्टवेर सल्लामसलत कंपनीची सुरुवात केली. त्याद्वारे त्यांनी विकीचे पहिले प्रारूप "विकीविकीवेब" हे १९९५ च्या वर्षात सुरू केले. हवाई (Hawaii) प्रदेशातील भाषेत 'विकी-विकी'चा अर्थ 'लौकर लौकर' किंवा 'चटपट' असा होतो.

अमेरिकेतील ओरेगॉन प्रांतातील बिव्हर्टन येथे ते वास्तव्यास आहेत आणि न्यू रेलिक या सॅनफ्रान्सिस्को येथील सॉफ्टवेर उद्योगसमूहात ते कार्यरत आहे. ते आधी 'सिटिझन ग्लोबल' साठी को-क्रिएशन झार होते. ते 'नायकी' या जगप्रसिद्ध पादत्राण निर्मात्या कंपनीचे पहिले 'अधिक चांगल्या जगा'चे प्रतीक होते.

विकीविषयक "दि विकी वे" या पुस्तकाचे ते लेखक आहेत. विकी संशोधक आणि व्यवहार या 'विकीसिम' WikiSym चर्चासत्र मालिकेचे ते बीजभाषण करणारे वक्ते आहेत.

व्यक्तिगत माहिती

[संपादन]

वॉर्ड कनिंगहॅम यांचा जन्म अमेरिकेतील इंडियाना येथील मिशिगन शहरात झाला.[]

हेही पाहा

[संपादन]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ "Ward's Home Page". c2.com. 2019-03-13 रोजी पाहिले.