वेदाची चार उपांगे
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
वेद एकून चार आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छन्द, ज्योतिश हे सहा वेदांग आहेत. पुराण, न्याय, मीमांसा, धर्मशास्त्र ही वेदांची उपांगे आहेत त्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे-
१) पुराण - पुराणे म्हणजे व्यास विरचित सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वन्तर व वंशानुचरित यांचे प्रतिपादक आहे. ते 18 आहे. ब्राम्ह, पद्म, वैष्णव, शैव, भागवत, नारदीय, मार्कण्डेय, आग्नेय, भविष्य, ब्रम्हवैवर्त, लिंग, वराह, स्कन्ध, वामन, कूर्म, मत्स्य,गरूड, ब्रम्हाण्ड इ.
2) न्याय - न्यायदर्शने यांना आन्विक्षिकी म्हणतात. ही दर्शने पाच अध्यायांमध्ये विभागलेली असून गौतमप्रणीत आहेत. प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टान्तत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितण्ड, हेत्वाभास, इ. पदार्थांचे उद्देश, लक्षण, द्वारे तत्त्वज्ञान याचे प्रयोजन म्णजे न्याय होय. कणाद यांनी दहा अध्यायांमध्ये वैशेषिक शास्त्राची नि्रमिती केली.केले. शक्तिग्रह हे याचे प्रयोजन आहे.
३) मीमांसा - मीमांसाचे दोन प्रकार आहेत. कर्ममीमांसा व ज्ञानमीमांसा. जैमिनीने बारा अध्यायांमध्ये कर्ममीमांसाचे प्रणयन केले. व इतर चार अध्यायांमध्ये संकर्णन कांडाचे प्रणयन केले. तसेच चार अध्यायांमध्ये बादरायण व्यासांनी ज्ञानकांड विभागले आहे. जीव व ब्रह्म यांच्या एकात्मतेचे प्रतिपादन हे मीमांसांचे प्रयोजन आहे.
४) धर्मशास्त्र - मनु, विष्णू, यम, वसिष्ट, दक्ष, पराशर, गौतम, लिखित, व्यास, कात्यायन, नारद इय्यादी अनेक आचार्यांनी धर्मशास्त्राची रचना केली. महाभारत, रामायण धर्मशास्त्रांतर्गत येतात.