Jump to content

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (कोल्हापूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे महाविद्यालय पश्चिम महाराष्ट्रामधील एक प्रमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असून या महाविद्यालयामध्ये पदवी व पदव्योत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची सोय आहे.

अभ्यासक्रम

[संपादन]

या महाविद्यालयामध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी (एम .बी .बी. एस .) १०० विद्यार्थांची सोय आहे[]. हे विद्यार्थी बारावीनंतर सी. ई .टी. परीक्षेमधून निवडण्यात येतात. अभ्यासक्रमाचा कालावधी ५ वर्षे ६ महीने असून या मध्ये १ वर्ष आंतरवासिता समाविष्ट आहे. महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाबरोबर सलंग्न आहे.[]

इतिहास

[संपादन]

पश्चिम महाराष्ट्रातील व कोकण भागातील रुग्णांची होणारी गैरसोय थांबण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन २००१ साली या महाविद्यालयाची स्थापना केली.[] सन २००१ साली छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयमध्ये या महाविद्यालयाची स्थापना झाली. प्रशिक्षित डॉक्टरांची पहिली तुकडी २००७ साली बाहेर पडली.

परिसर

[संपादन]

महाविद्यालय छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय परिसरामध्ये वसलेले असून विद्यार्थ्यांची वसतिगृहे व प्रथम वर्षाचे विभाग शेंडा पार्क परिसरामध्ये आहेत .

विभाग

[संपादन]

विभाग महाविद्यालयामध्ये प्रथम ते तृतीय वर्षापर्यंत एकूण २१ विभाग आहेत. या महाविद्यालयाचा हृदयरोग विभाग तेथे होणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी प्रसिद्ध आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "संग्रहित प्रत". 2011-11-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2012-05-11 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2011-11-24 रोजी पाहिले.
  3. ^ "संग्रहित प्रत". 2021-03-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-11-24 रोजी पाहिले.