ये रे ये रे पावसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ये रे ये रे पावसा,
तुला देतो पैसा;
पैसा झाला खोटा,
पाउस आला मोठा!

ये ग ये ग सरी,
माझे मडके भरी
सर आली धावून
मडके गेले वाहून!

पाउस पडतो रिमझिम,
आंगण झाले ओलेचिंब;
पाउस पडतो मुसळधार,
रान होई हिरवेगार!!