Jump to content

मालपुआ रबडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रबडी
मालपुआ

मालपुआ रबडी हा एक गोड खाद्यपदार्थ आहे. मालपुआरबडी या दोन पदार्थाना एकत्र केल्यावर जे मिष्टान्न तयार होते त्याला मालपुआ रबडी असे म्हणले जाते.[]


मालपुआ साहित्य

[संपादन]

१ वाटी मैदा, अर्धी वाटी कणीक, पाव वाटी बारीक रवा, पाव लिटर दूध, ४ चमचे पिठीसाखर, अर्धा चमचा वेलची पूड, बदामाचे काप आवश्क्तेनुसार, तेल किवा तूप.[]

रबडी साहित्य

[संपादन]

१ लिटर फॅट दूध, अर्धी वाटी साखर, २ थेंब केवडा इंसेन्स, वेलची पूड, गुलाब पाकळ्या.

कृती

[संपादन]

रवा, मैदा, कणीक, व पिठीसाखर एकत्र करा. दूध घालून घट्टसर भिजवा. २-३ तास झाकून ठेवा. खोलगट तव्यावर किवां नॉन स्टिक पॅनवर तूप लावून त्यावर तयार मिश्रण १ डावभर घाला. तूप सोडून दोन्ही बाजूंनी बदामी रंगावर मालपुवे भाजावे. दुध आटवून पाव लिटर राहील एवढे करा. त्यात साखर, बदाम काप, काजू, पिस्ता पण घाला. वेलची व इंसेन्स घाला. तयार मालपुव्यावार रबडी घालून गुलाब पाकळ्या घालून सजवा

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Malpua With Kesar Rabdi | Holi Special Recipe | The Foodie | Home Chef Recipe". www.timesnownews.com (इंग्रजी भाषेत). 2021-05-30 रोजी पाहिले.
  2. ^ Hindi, Lifeberrys; Lifeberrys (2020-05-27). "लॉकडाउन रेसिपी : मीठे में ट्राई करें रबड़ी मालपुआ, हो जाएंगे इसके स्वाद के दिवाने". lifeberrys (हिंदी भाषेत). 2021-05-30 रोजी पाहिले.