मनाचे श्लोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विकिस्रोत
विकिस्रोत
मनाचे श्लोक हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.

’मनाचे श्लोक’ हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर असे पद्य आहे. [ संदर्भ हवा ]

मराठी पारंपरिक संस्कृतीत समर्थ रामदासकृत 'मनाचे श्लोक' सकाळच्या तसेच सायंकालीन प्रार्थनेत, प्रभातफेरीत, संस्कार व सुविचार म्हणून आणि संप्रदायातील शिष्यांकडून भिक्षा मागतानाही म्हटले जात.[ संदर्भ हवा ]

पद्य रचनेची वैशिष्ट्ये[संपादन]

या पद्यात श्लोकांची एकूण संख्या २०५ आहे. मनाच्या श्लोकांची रचना ही भुजंगप्रयात वृत्तात आहे. प्रत्येक ओळीत १२ अक्षरे आहेत.[१]

संबधित ग्रंथ[संपादन]

  • 'मनाचे श्लोक' - ल.रा. पांगारकर - इ.स. १९२४
  • सार्थ मनाचे श्र्लोक - ज्ञानेश्वर तांदळे
  • मनाच्या श्लोकातून मनःशांती - सुनील चिंचोलकर
  • समर्थ रामदासविरचित मनाचे श्लोक - डॉ. र.रा. गोसावी
  • सार्थ मनाचे श्लोक - केशव विष्णू बेलसरे

इतर भाषांतील अनुवाद[संपादन]

  • मन-समझावन (इ.स. १७५८) - भाषा दखनी (उर्दू) -(स्वैर रूपांतर) अनुवाद : शाह तुराब (१६९५ - १७८३)

शाहतुराब हे सूफी धर्म प्रचारक होते. ते स्वतःस हुसेनी ब्राह्मण म्हणवत. शाह तुराब हे सूफी संप्रदायाच्या प्रचारार्थ दक्षिणेत आधी तिरुवन्नमलाई (तामिळनाडू) व पुढे कर्नाटकात गेले. दक्षिण भ्रमंतीत शाह तुराब तंजावरला पोहोचले तेव्हा तिथे प्रतापसिंगराजे भोसले (१७३९-६३) अधिपती होते. तंजावरच्या वास्तव्यात शाह तुराब तेथील रामदासांच्या मठात गेले. तिथेच मनाच्या श्लोकाची पोथी त्यांच्या पाहण्यात आली. त्यांनी ती वाचली व तेथे असतानाच तिचा दखनीत अनुवाद केला.[२]

गायनस्वरूपातील मनाचे श्लोक (अल्बम्स) - गायक/गायिका[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "मनाचे श्लोक".
  2. ^ {http://www.lokprabha.com/20110325/dastan.htm दास्तॉं ए दक्खान - धनंजय कुळकर्णी यांचा साप्ताहिक लोकप्रभा मधील लेख] दिनांक ६ जून २०१३ रात्रौ १२ वाजून ४५ मिनिटांनी जसा दिसला.