फ्रेडरिको गार्सिया लोर्का
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| फेथेरीको गार्सीआ लोर्का | |
लोर्का, सन १९१४ |
|
| पूर्ण नाव | फ्रेडरिको डेल सग्राडो कोराझो डी जिसस गार्सिया लोर्का |
| जन्म | जून ५, इ.स. १८९८ फ्वेंते व्हाकेरोस, ग्रानादा, अॅँडल्युसिया, स्पेन |
| मृत्यू | ऑगस्ट १९, इ.स. १९३६ ग्रानादा, स्पेन |
| कार्यक्षेत्र | साहित्य |
| राष्ट्रीयत्व | स्पॅनिश |
| साहित्यप्रकार | काव्य, नाट्यलेखन, नाट्यदिग्दर्शन |
| चळवळ | जनरेशन ऑफ २७ |
| वडील | फेथेरीको गार्सीआ रॉड्रिग्ज |
| आई | व्हिसेंटा लोर्का रोमरो |
| स्वाक्षरी | |
हे नाव स्पेनमधील रिवाजाप्रमाणे आहे; पहिले किंवा पितृकुलनाम गार्सिया असून दुसरे किंवा मातृकुलनाम लोर्का आहे.
फ्रेडरिको डेल सग्राडो कोराझो डी जिसस गार्सिया लोर्का (स्पॅनिश उच्चार : feðeˈɾiko ɣarˈθi.a ˈlorka (फेथेरीको गार्सीआ लोर्का); जून , इ.स. १८९८ - ऑगस्ट १९, इ.स. १९३६) हा स्पॅनिश कवी, नाटककार आणि रंगमंचीय दिग्दर्शक होता. जनरेशन ऑफ २७ चा प्रतीकात्मक प्रतिनिधी म्हणून गार्सिया लोर्काला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. स्पॅनिश गृहयुद्धात फॅसिस्ट गटाच्या लोकांनी लोर्काचा खून केला. सन २००८ मध्ये एका स्पॅनिश न्यायाधीशाने लोर्काच्या मृत्यूची चौकशी सुरू केली. अल्फकरजवळच्या संभाव्य दफनस्थळाचे उत्खनन करण्यास गार्सिया लोर्का कुटुंबाने अखेर परवानगी दिली पण त्या जागी मानवी अवशेष मिळाले नाहीत.
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत