चकवा (भूत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समजानुसार, भुताचा एक प्रकार. असाही समज आहे की, या प्रकारातले भूत रानात गेलेल्या एकट्या माणसास ऐन मध्यान्ही चकविते. त्यास रस्त्याचा विसर पडतो. तो (त्या चकव्याच्या क्षेत्रात) तेथेच फिरत राहतो. सूर्य मावळल्यावर ती व्यक्ती त्यातून सुटते. चकव्याच्या तावडीत सापडल्यावर त्याला प्यायला पाणी मागितल्यास तो माणसाला विहिरीत नेऊन बुडवितो असा समज आहे.[ संदर्भ हवा ]