गोविंद चिमणाजी भाटे
Appearance
गोविंद चिमणाजी भाटे (जन्म : १९ सप्टेंबर, १८७०; - १९४६) हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य असून ते सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते.[ संदर्भ हवा ]
शिक्षण व कारकीर्द
[संपादन]१८८८मध्ये मॅट्रिक झाल्यावर, गोविंद चिमणाजी भाटे यांनी कॉलेजचे पहिले वर्ष फर्ग्युसनमध्ये केले आणि ते डेक्कन कॉलेजात दाखल झाले. तेथे ते बी.ए.व एम.ए.उत्तीर्ण झाले. त्यांना या शिक्षणादरम्यान एलिस स्कॉलरशिप, दक्षिणा फेलोशिप आणि काशिनाथ त्र्यंबक तेलंग पदक मिळाले. त्यांनी अर्थशास्त्राचीं मूलतत्त्वें व हिंदुस्थानची सद्यः सांपत्तिक स्थिति आणि ती सुधारण्याचे उपाय हे पुस्तक १९१० साली लिहिले. हे पुस्तक विकिस्रोतवर उपलब्ध आहे.[१]
संदर्भ
[संपादन]यांचे अथवा यांच्याशी संबंधित लेखन मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.: