Jump to content

गुरुकुल शिक्षण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुरुकुल शिक्षण हे भारतातील अतिप्राचिन शिक्षण प्रकारातील एक आहे.

शिक्षणाची पद्धत

[संपादन]

गुरुकुल शिक्षणाचा कालावधी अदमासे कौटिल्या आधीचा आहे. या शिक्षण पद्धतित विद्यार्थ्यास शिक्षकाच्या घरी , त्या कुटुंबाचा एक भाग बनून शिक्षण घ्यावे लागे. शिक्षकास 'गुरु' तर विद्यार्थ्यास 'शिष्य' हे संबोधन वापरले जात असे. वयाच्या ७ व्या किंवा ८व्या वर्षी गुरुं कडे पाठविण्याचा प्रघात होता. हे शिक्षण १२ वर्ष चाले. या शिक्षण पद्धतीत अनेक विद्यांचा समावेश होता. विद्याभ्यास, शस्राभ्यास, योगाभ्यास अशा अनेक प्रकारच्या शिक्षणाचा समावेश असे.

गुरुंच्या घरी शिकत असताना शिष्यास घरातील अनेक कामात मदत करावी लागे. कपडे धुणे, भांडी धुणे, स्वयंपाक करणे अशा सर्व प्रकारच्या कामांचा समावेश असे. ही पद्धत पूर्ण भारतात प्रचलीत होती. नंतर ही पद्धत धार्मिक अभ्यासापुरती मर्यादित राहिली.

या परंपरेत गुरू शिष्याकडून कोणतेहि मूल्य घेत नसे. शिक्षण पूर्ण झाल्यावर शिष्य गुरुंना विनम्रतेने गुरुदक्षिणा अर्पण करीत असत. गुरुदक्षिणेत कृतज्ञतेचा भाव जास्त असे.


विद्याभ्यास

[संपादन]

अनेक विविध विद्यांचा अभ्यास येथे होत असे. उदा. वैदिक विद्या, विधिविद्या, इ.


शस्राभ्यास

[संपादन]

अनेक विविध शस्रांचा अभ्यास येथे होत असे.उदा.भाला, धनुष्य, गदायुद्ध, तलवार इ.


शास्राभ्यास

[संपादन]

अनेक विविध शास्रांचा अभ्यास येथे होत असे. उदा. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, भाषाशास्त्र, वेदशास्त्र, इ.


योगाभ्यास

[संपादन]

अनेक विविध योग विद्यांचा अभ्यास येथे होत असे. उदा.हटयोग, राजयोग, इ.

संज्ञा

[संपादन]
  • गुरु, गुरुवर्य,आचार्य - ज्या व्यक्ति शिक्षण देतात किंवा शिक्षक म्हणून कार्यभार बघतात त्यांना ही संज्ञा वापरली जात असे.
  • गुरुमाता, गुरुपत्नी - शिक्षकांच्या पत्नीस ही संज्ञा वापरली जात असे.
  • गुरुकन्या, गुरुभगिनी - शिक्षकांच्या मुलीस ही संज्ञा वापरली जात असे.
  • गुरुबंधू - सहविद्यार्थ्यास.
  • आश्रम - शिक्षकांच्या घरास किंवा जिथे शिक्षण घेतले त्या जागेस ही संज्ञा वापरली जात असे.


प्रकार

[संपादन]

प्राचीन भारतात तीन प्रकारच्या शिक्षण संस्था पद्धति अस्तित्वात होत्या :

(१) गुरुकुल- जिथे विद्यार्थी आश्रमात राहून विद्याध्ययन करीत. (२) परिषद- जिथे तज्ज्ञ शिक्षकांद्वारे शिकविले जात. (३) तपस्थली-जिथे मोठी सम्मेलन होत.


गुरुकुल आश्रमामध्ये कालांतराने हजारों विद्यार्थी शिकावयास येत. अशा आश्रमांच्या प्रमुखांना 'कुलपति' म्हणत असत.