खाणी (हिंदू तत्त्वज्ञान)
भारतीय हिंदू वेदांत दर्शनानुसार सृष्टी ही चार प्रकारच्या निर्मितीत मोडते, म्हणजे कोणताही सजीव प्राणी हा चार प्रकाराने जन्माला येतो.
- जारज
- अंडज
- स्वेदज
- उद्भिज
जारज
[संपादन]गाय, म्हैस इत्यादी पशु, हरिणे, ज्यास दोन्हीकडे दात आहेत असे व्याल, राक्षस, पिशाचे व मनुष्ये हे जरायुज प्राणी आहेत. जरायु म्हणजे वार; त्यातून हे प्राणी बाहेर पडतात म्हणून ते जरायुज होत. ॥४३॥
अंडज
[संपादन]पक्षी, सर्प, नक्र, मत्स्य, कासवे व अशाच प्रकारचे सरडे इत्यादी स्थलचर व शंखादि जलचर प्राणी ते अंडज होते. हे प्रथम अंड्यात होतात व नंतर त्यातून निघतात म्हणून हे अंडज होत. ॥४४॥
स्वेदज
[संपादन]चिलटे, उवा, माशा, ढेकूण इत्यादी प्राणी व तसेच प्रत्यक्ष उष्णतेपासून होणारे मुंग्यासारिखे व असेच दुसरेही प्राणी स्वेदज होय. स्वेद म्हणजे पार्थिव पदार्थास उष्णतेमुळे प्राप्त होनारा ओलसरपणा, त्याच्यापासून वरील प्राण्यांची उत्पत्ति होते म्हणून त्यास स्वेदज म्हणतात. ॥४५॥
उद्भिज्ज
[संपादन]वृक्षादि स्थावर पदार्थ उद्भिज्ज आहेत. कारण, ते बीज व भूमी यांस फोडून वर येत असतात. पण त्यांच्यामध्ये दोन प्रकार आहेत. काही बीजापासून निर्माण होतात व काहींच्या शाखा भूमीत पुरल्या तरी त्याच्यापासून वृक्ष होतात. आता त्यात ज्या औषधी असतात त्यांची फळे पक्व झाली की, त्या मरतात व त्यास पुष्कळ फुले व फळे येतात. ॥४६॥
संदर्भ : अध्याय १ला मनुस्मृती