कारंजा-सोहोळ वन्यजीव अभयारण्य
Appearance
(कारंजा-सोहोळ अभयारण्य या पानावरून पुनर्निर्देशित)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
कारंजा-सोहोळ अभयारण्य हे वाशीम जिल्ह्यातील सुमारे १८ चौ. कि. मी. क्षेत्रावरील छोटेसे अभयारण्य आहे.
कारंजा-सोहोळ हे काळविटांसाठीचे अभयारण्य म्हणून ओळखले जाते. काळविटांना राहण्यायोग्य जागा तयार करण्यासाठी आणि त्यातून काळविटांची संख्या वाढविण्यासाठी वन विभागाने प्रयत्न सुरू केलेले आहेत. वाशीम जिल्ह्यातील कारंजा-सोहोळ या काळवीट अभयारण्याचा दर्जा सुधारण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतलेला आहे. मात्र, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे कारंजा-सोहोळ हे गवती माळरान आणि झुडुपी जंगल झाले आहे. त्यामुळे आपल्याला येथे काळवीट, नीलगाय, रानडुक्कर दिसून येते.[१]
भौगोलिक स्थान
[संपादन]- कारंजा-सोहोळ अभयारण्य हे पश्चिम विदर्भातील वाशीम जिल्ह्यात असून कारंजा पासून मानोरा रोड वर ७.४ कि. मी. अंतरावर आहे.
- कारंजा-सोहोळ हे अभयारण्य १८.३१ किमी२ परिसरात पसरलेले आहे.
- कारंजा परिक्षेत्रातील कारंजा, गिर्डा, दादगाव व सोमठाणा नियतक्षेत्राचा 781.4 हेक्टर वनक्षेत्राचा अभयारण्यात समावेश केला आहे.
- कारंजा सोहोळअभयारण्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्ह्याची सीमा आहे तसेच, पश्चिमेस मंगरुळपीर तालुक्याची सीमा आहे.
- उत्तरेस कारंजा तालुक्यातील उंबर्डा, दादगांव, पिंपळखेड, गिर्डा, मलकापूरच, मिर्झापूरची शेतीची हद्द आहे. दक्षिणेस अडाण नदी आणि मानोरा तालुक्याची हद्द आहे.[१]
वैशिष्ट्य
[संपादन]कारंजा सोहोळ अभयारण्य हे मुख्यत: काळविटांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच २००० साली या अभयारण्याला माळरानास अभयारण्य म्हणून घोषित केले होते.
- या अभयारण्यात काळवीट, रानडुक्कर, कोल्हा, नीलगाय, रानमांजर यांचे यांचे अस्तित्त्व आहे. कारण अभयारण्याचा बहुतांश भाग गवताळ प्रदेश असून, पर्यटकांना दूरवर नजर टाकून निसर्गाचा आनंद घेणे सहज शक्य आहे.
- या अभयारण्यात प्राण्यांव्यातीरिक वृक्ष सुद्धा आढळून येतात जसे कि पळस, बेहडा, काटसावर, मोहा, कळंब, खैर, इत्यादी वृक्ष प्रजाती आढळतात.
- तसेच या अभयारण्यात जवळपास १४५ प्रजातींचे पक्षी आपल्याला दिसून येते.
- जंगलात गेल्यानंतर किती वन्यप्राणी नैसार्गिक दृश्य दिसतील, असा प्रश्न वन पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतोच. कारण अनेकदा दिवसभर वनभ्रमंती केल्यानंतरही पदरी निराशाच पडत असते, मात्र, सुटीत नजीकच्या कारंजा सोहोळ काळवीट अभयारण्यास भेट दिल्यास आपल्याला नक्कीचआनंद मिळू शकेल. कारण येथे बाराही महिने काळवीट, नीलगाय, रानडुक्कर यांचे अस्तित्त्व असते.
- या अभयारण्याला ‘गवती माळरान’ असेही ओळखले जाते. काळवीट हा प्राणी साधारणतः गवती माळरांनावर आढळला जातो. मात्र, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे कारंजा-सोहोळ हे गवती माळरान न राहता झुडुपी जंगल झाले आहे.
- गवती माळरान या प्रकारात या अभयारण्याची गणना केली जाते.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "कारंजाचे काळवीट अभयारण्य बहरणार". maharashtratimes.indiatimes.com. १६ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "वन्यजीवांच्या मुक्त दर्शनासाठी सोहोळ अभयारण्य". divyamarathi.bhaskar.com. १६ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.