Jump to content

ओम जय हो विश्वात्मका परिवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ओम जय हो विश्वात्मका या परिवाराची स्थापना नाथभक्त दिगंबरदास घारे यांनी २००० साली (कोठे?) केली. या परिवाराची स्थापना करण्यामागे प्रत्येक मानवी जिवाला आत्मोद्धाराचा मार्ग दाखवणे हा हेतू आहे. या परिवारातर्फे दत्तजयंती, गुरुपौर्णिमा, महाशिवरात्र व गुरूप्रतिपदा हे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.

साधकाने अनुग्रह घेतल्यानंतर काय साधना करायची यासाठी संपूर्ण साधनेची माहिती असलेली न्यास साधन पुस्तिका असते. या पुस्तिकेमार्फत लहान-मोठ्या सर्व साधकांना अतिशय सोप्या मार्गाने साधना उपलब्ध करून दिली जाते.

परिवारात वयाच्या दहाव्या वर्षी गुरूदीक्षा दिली जाते.