२०२१-२२ समर ट्वेंटी२० बॅश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०२१-२२ समर ट्वेंटी२० बॅश ही संयुक्त अरब अमिराती मध्ये ऑक्टोबर २०२१ दरम्यान झालेल्या क्रिकेट सराव सामन्यांची मालिका होती. सदर सामने हे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० प्रकारात खेळवले गेले. २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक मध्ये सहभाग घेणाऱ्या असोसिएट संघांचा सराव व्हावा यासाठी या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यजमान संयुक्त अरब अमिरातीसह आयर्लंड, स्कॉटलंड, नामिबिया आणि पापुआ न्यू गिनी या देशांनी सदर मालिकेत भाग घेतला.

सर्व संघांनी यादृच्छिक सामने खेळले. आयर्लंडने संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध तीन, नामिबियाने संयुक्त अरब अमिराती, पापुआ न्यू गिनी आणि स्कॉटलंड विरुद्ध एक तर पापुआ न्यू गिनी आणि स्कॉटलंडने एकमेकांविरुद्ध एक सामना खेळला. स्पर्धेला कोणताही विजेता घोषित करण्यात आला नाही.

सराव सामने[संपादन]

५ ऑक्टोबर २०२१
१२:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१७६ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१७८/५ (१७.५ षटके)
हॅरी टेक्टर ३८ (३३)
साफयान शरीफ २/२७ (४ षटके)
जॉर्ज मुन्से ६७ (२५)
बेन व्हाइट २/३५ (४ षटके)
स्कॉटलंड ५ गडी राखून विजयी.
आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई
पंच: आसिफ इक्बाल (सं.अ.अ.) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: जॉर्ज मुन्से (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, क्षेत्ररक्षण.

६ ऑक्टोबर २०२१
०९:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
२४९/३ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१६५/९ (२० षटके)
नामिबिया ८४ धावांनी विजयी.
आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि अँड्रु लोव (ना)
सामनावीर: गेरहार्ड इरास्मुस (नामिबिया)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, क्षेत्ररक्षण.


सामने[संपादन]

५ ऑक्टोबर २०२१
०९:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१५९/८ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१४२/९ (२० षटके)
क्रेग विल्यम्स ५७ (३७)
झहूर खान ४/२९ (४ षटके)
वसीम मुहम्मद ३९ (३६)
जॅन फ्रायलिंक ६/२४ (४ षटके)
नामिबिया १७ धावांनी विजयी.
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि इफ्तिकार अली (सं.अ.अ.)
सामनावीर: जॅन फ्रायलिंक (नामिबिया)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.
  • संयुक्त अरब अमिराती आणि नामिबिया मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • नामिबियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात संयुक्त अरब अमिरातीला प्रथमच पराभूत केले.
  • काशिफ दाउद, वसीम मुहम्मद (सं.अ.अ.) आणि रुबेन ट्रम्पलमान (ना) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • याआधी दक्षिण आफ्रिकेकडून खेळल्यानंतर डेव्हिड विसी ने या सामन्यातून नामिबियातर्फे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

७ ऑक्टोबर २०२१
०९:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१२३/७ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१२४/३ (१८.५ षटके)
पॉल स्टर्लिंग ५३ (४६)
बसिल हमीद ३/२० (३.५ षटके)
आयर्लंड ७ गडी राखून विजयी.
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: कर्टिस कॅम्फर (आयर्लंड)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी.
  • संचित शर्मा (सं.अ.अ.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

८ ऑक्टोबर २०२१
०९:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१६३/४ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१०९ (१८.४ षटके)
चिराग सुरी ५१ (४४)
जोशुआ लिटल १/२४ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती ५४ धावांनी विजयी.
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
पंच: इफ्तिकार अली (सं.अ.अ.) आणि अँड्रु लोव (ना)
सामनावीर: पलानिअपन मय्यपन (संयुक्त अरब अमिराती)

८ ऑक्टोबर २०२१
१३:३०
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१५४/५ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१५६/२ (१७.५ षटके)
आसाद वल्ला ५५ (४३)
हमझा ताहिर २/३५ (४ षटके)
जॉर्ज मुन्से ५० (३३)
चॅड सोपर १/२३ (२ षटके)
स्कॉटलंड ८ गडी राखून विजयी.
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: जॉर्ज मुन्से (स्कॉटलंड)

९ ऑक्टोबर २०२१
०९:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१३७/८ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१३८/५ (१७.४ षटके)
क्रेग विल्यम्स ५० (३७)
मार्क वॅट २/११ (४ षटके)
नामिबिया ५ गडी राखून विजयी.
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
पंच: इफ्तिकार अली (सं.अ.अ.) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: क्रेग विल्यम्स (नामिबिया)
  • नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण.

१० ऑक्टोबर २०२१
०९:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१३४/५ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१३९/३ (१६.१ षटके)
वसीम मुहम्मद १०७* (६२)
क्रेग यंग २/२९ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती ७ गडी राखून विजयी.
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि अँड्रु लोव (ना)
सामनावीर: वसीम मुहम्मद (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.

१० ऑक्टोबर २०२१
१३:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१७४/६ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१६०/६ (२० षटके)
क्रेग विल्यम्स ५७ (४३)
आसाद वल्ला २/१० (२ षटके)
टोनी उरा ६९ (४३)
जेजे स्मिट २/२४ (४ षटके)
नामिबिया १४ धावांनी विजयी.
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
पंच: इफ्तिकार अली (सं.अ.अ.) आणि आसिफ इक्बाल (सं.अ.अ.)
सामनावीर: जेजे स्मिट (नामिबिया)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, क्षेत्ररक्षण.
  • मायकेल व्हान लिंगेन (ना) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • नामिबियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात पापुआ न्यू गिनीला प्रथमच पराभूत केले.