हिंदू स्वयंसेवक संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू स्वयंसेवक संघ ही भारताबाहेरील हिंदू धर्मीयांच्या संघटनासाठी काम करणारी संघटना आहे. या संघाची उद्दिष्टे भारताबाहेरील विखुरलेल्या हिंदू समाजातील लोकांना एकत्र आणणे आणि हिंदू धर्माच्या तत्त्वांचा व मूल्यांचा प्रसार करणे ही आहेत. हिंदू स्वयंसेवक संघाच्या अमेरिकेत साधारण १०० तर ब्रिटन मध्ये ७५ शाखा आहेत. ह्यातील बऱ्याचशा शाखा दर आठवड्यात एकदा भरवल्या जातात[ संदर्भ हवा ]. या संघटनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काही अंशी प्रभाव असला, तरीही हिंस्वसंचा कोणताही राजकीय कार्यक्रम नसल्यामुळे रास्वसंप्रमाणे राष्ट्रवादाच्या अंगाने हिंदुत्ववादाचे प्रतिपादन तो करत नाही.

बाह्य दुवे[संपादन]

  • "हिंदू स्वयंसेवक संघ - अमेरिका" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "हिंदू स्वयंसेवक संघ - युनायटेड किंग्डम" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)