साचा चर्चा:उल्लेखनीयता

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एखाद्या लेखात हा साचा लावल्यावर तो लेख आपोआप वगळण्यात येण्यासाठी उमेदवार ठरतो. खरोखरच उल्लेखनीय नसलेले लेख वगळले जावे किंवा त्यांचे इतरत्र विलीनीकरण केले जावे हे बरोबर असले तरीही हा साचा लावलेला प्रत्येक लेख वगळला जावाच हे चर्चेशिवाय ठरविणे बरोबर नाही.

असे असता या साच्याद्वारे लेखाचे आपोआप वगळले जाण्याचा उमेदवार होणे काढावे असा प्रस्ताव मी मांडत आहे.

@ आणि Sureshkhole:

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०८:०२, ८ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@अभय नातू आणि Sureshkhole:

प्रस्तावाला माझा सहर्ष पाठिंबा! देर आये दुरुस्त आये. (हा प्रस्ताव म्हणजे अॅट्राॅसिटीच्या गुन्ह्यामध्ये अटकेपूर्वी चौकशी करण्यासारखे आहे. ) ... (चर्चा) १७:१६, ८ एप्रिल २०१८ (IST)[reply]


@अभय नातू आणि : यावरून मला असे लक्षात आले की, प्रताधिकार भंग शंका, उल्लेखनीयता, बदल, पान काढा, संदर्भ हवा अश्या सगळ्याच साच्यांचे साचे लावल्यावर पुढे काय होते हे धोरण ठरवण्याची गरज आहे. तेव्हा आपण त्याबाबतची चर्चा सुरू करावी असे मला वाटते कारण. इतके दिवस कोणी हे साचे इतक्या मोठ्या प्रमाणात वापरले नव्हते त्यामुळे आणि इतर अनेक कारणांमुळे त्याची धोरणे ठरवली गेलेली नसावीत. त्याची तशी धोरणे ठरवून, ठरल्यावर तीही साचा पानावर टाकता येतील, त्यामुळे साच्याचा वापर कसा करायचा(साचा वापरताना आणि प्रत्यक्षात लावलेल्या साच्याची जिवनप्रणाली काय असेल?) याविषयीचे धोरण आपल्याला एकाच ठिकाणी मिळून जाईल.

  1. प्रताधिकार भंग शंका मजकूर - कधी काढून टाकावा? अख्खे पान नकल-डकव असल्याल पान काढण्यात यावे का? ह्या क्रिया कोणाला करता येतील? (म्हणजे साचे लावणे आणि मजकूर काढणे एकाच माणसाला करता येतील का?)
  2. उल्लेखनीयता - उल्लेखनीयता सिध्द करण्यास जर मुळ सदस्य अक्षम असल्यास तो मजकूर कधी काढला जाईल?
  3. संदर्भ हवा - साचा लावल्या नंतर किती काळ वाट पाहाण्यात यावी ? आणि संदर्भ नसलेला मजकूर काढण्यात याव? शिवाय कोणी काढावा?

असे अनेक प्रश्न आहेत तेव्हा जसे इंग्रजी विकीवर एसेज आहेत तसे एसेज तरी आपण तयार करावे का? किंवा सध्याच्या घडीला आपण प्रत्येक साच्याचे लावल्यापासून त्याचा प्रत्यक्ष परिणाम ह्याची कालमर्यादा तरी ठरवून घ्यावी असे मला वाटते. जेणेकरुन ह्या सगळ्या प्रपंचाचा उपयोग होईल आणि मराठी विकीची दयनीय अवस्थेतून(इतका मोठा मजकूर प्रताधिकार भंगात सापडत आहे!) सुधारणा होऊन काहीतरी मानांक आपल्याला गाठता येईल. WikiSuresh (चर्चा) २०:१०, ८ एप्रिल २०१८ (IST)[reply]

होय, हा आणि इतर साच्यांच्या संदर्भातील धोरण ठरविणे किंवा धोरणांचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी ध्येयधोरणे चावडीवर चर्चेची सुरुवात करुयात.
जर धोरणांबद्दलचे एसे किंवा मतमांडणी केली तर तेथून चर्चेस सुरुवात करणे सोपे पडेल.
अभय नातू (चर्चा) २३:५४, ९ एप्रिल २०१८ (IST)[reply]
@ आणि Sureshkhole:
हे पहा - विकिपीडिया:उल्लेखनीयता. हे आत्ताचे धोरण आहे. हे बरोबरच आहे असे नाही. चर्चा येथून सुरू व्हावी असे मला वाटते.
अभय नातू (चर्चा) ०८:५२, ११ एप्रिल २०१८ (IST)[reply]
ता.क. या पानावर (आता विदागारित केलेले) मोठ्या प्रमाणात उलटसुलट चर्चा झालेली आहे. ही पहावी परंतु त्यातील मुद्दे सोडून इतर वायफळ आरोप-प्रत्यारोपांकडे दुर्लक्ष करावे.