राजस्थान संपर्क क्रांती एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१२८२५/१२८२६ राजस्थान संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे राजस्थानमधील जोधपूर शहराच्या जोधपूर रेल्वे स्थानक ते दिल्लीमधील दिल्ली सराय रोहिल्ला स्थानकांदरम्यान आठवड्यातून तीनदा धावते. उत्तर पश्चिम रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या राजस्थान संपर्क क्रांती एक्सप्रेसला जोधपूर ते दिल्ली दरम्यानचे ६१४ किमी अंतर पार करायला १० तास ३५ मिनिटे लागतात.

तपशील[संपादन]

वेळापत्रक[संपादन]

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२४६३ दिल्ली सराय रोहिल्ला – जोधपूर २२:२५ ०८:३० रवि, बुध, शुक्र
१२८२६ जोधपूर – दिल्ली सराय रोहिल्ला १९:०० ०५:३५ मंगळ, गुरू, शनी

मार्ग[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]