धूळपाटी/सामूहिक भूमीवर कब्जा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सामूहिक भूमीवर कब्जा (Enclosure of the Commons)[संपादन]

भारतावर कब्जा करण्यापूर्वी अनेक शतके आधी इंग्लंडातले सगळे अरण्य आणि बहुतांश वन्यप्राणी नष्ट झाले होते. १०६६ मध्ये विल्यम द कॉंन्कररच्या राजवटीपासून ह्याची सुरुवात झाली होती. शिकारीचा शोकीन असलेल्या विल्यमने एक नवा जंगल विषयक कायदा लागू केला. इतर कायद्याच्या कक्षेबाहेर असलेल्या या कायद्याने वन्य पशु आणि त्यांच्या अरण्यातील अधिवासात सामान्य लोकांना शिकार करण्यास बंदी घातली. यापुढे राजाच्या राखीव अरण्यातील वन्य पशूंची सामान्य लोकांनी शिकार केली तर त्यांना पोचर अथवा चोरटे शिकारी ठरवून फाशीची शिक्षा फर्मावली जाऊ लागली. १०८६ मध्ये त्याने देशातील सर्व जमीन निरनिराळ्या सरदारांना वाटून दिली. या सरदारांनी राजाच्या पावलावर पाऊल टाकून ग्रामसजांच्या सर्व सामूहिक भूमीवर कब्जा केला आणि सामान्य लोकांना या भूमीवर शेती करण्यास, गुरे चरण्यास किंवा शिकार करण्यास बंदी घातली. अशा रीतीने इंग्लंडात सर्व जमिनीवर केवळ खाजगी मालकी कायद्याने मान्य करण्यात आली आणि सर्व सामूहिक मालकी अवैध ठरवण्यात आली. पुढची दोन शतके या अन्यायाविरुद्धचा सामान्य लोकांचा निषेध निष्ठुरपणे चिरडण्यात आला. याच्या दुष्परिणामातून १४ व्या शतकापर्यंत इंग्लंडातील सगळेच्या सगळे अरण्य आणि बहुतेक वन्यपशू नष्ट झाले.[१][२]

  1. ^ "Buy Sahyachala Ani Mee | सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी by Madhav Gadgil | माधव गाडगीळ online from original publisher Rajhans Prakashan". www.rajhansprakashan.com. 2024-05-14 रोजी पाहिले.
  2. ^ सुधारक, आजचा (2023-12-31). "पुस्तक परिचय - सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी". आजचा सुधारक. 2024-05-14 रोजी पाहिले.