धर्माजी प्रताप मुंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धर्माजी प्रतापराव मुंडे राजे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य आद्य क्रांतिकारक व राजे होते. वंजारी समाजाच्या प्रतापराव या कुळी मध्ये गर्जे व मुंडे हे वाडेभाऊ आहेत. प्रताप नव्हे तर प्रतापराव हे कूळ आहे. [१] इंग्रजनिजाम सरकारविरुद्ध राज्यातील पहिला उठाव परळी तालुक्यातील डाबी गावात झाला. धर्माजीराजे प्रतापराव मुंडे नामक निधडय़ा तरुणाने इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यप्राप्तीचे पहिले रणशिंग फुंकले. मात्र, राष्ट्रीय उठावाच्या (१८५७) ३९ वर्षे आधी झालेला हा लढा दुर्लक्षितच राहिला.या लढाईत वंजारी समाजाचे बालाघाटच्या डोंगररांगेत राहणारे निधड्या छातीच्या लोकांनी निजामाच्या सैन्याला पळवुन लावले.राज्यातील पहिले आद्यक्रांतिकारक म्हणून धर्माजी मुंडे डाबी गावात या लढाईचा स्मृतिस्तंभ आजही त्या तेजस्वी इतिहासाची साक्ष देत उभा आहे.

राष्ट्रीय उठावाच्याही ३९ वर्षे आधी परळी तालुक्यातील डाबी गावात, ३१ जुलै १८१८ रोजी इंग्रज-निजाम व वंजारी सैन्य आणि धर्माजी प्रतापराव मुंडे यांच्यात निकराची लढाई लढली गेली. निजामाने इंग्रजांशी हातमिळवणी केल्यावर शेतसारा पद्धत बदलली. धान्याऐवजी पैशांच्या स्वरूपात शेतसारा घेतला जाऊ लागला. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. या असंतोषातून धर्मराज मुंडे याने तरुण शेतकऱ्यांना एकत्रित करून बंड पुकारले. निजामांच्या नाक्यावर सशस्त्र हल्ले चढवून शस्त्रे गोळा केली व त्यांना सळो की पळो करून सोडताना स्वातंत्र्याचे बीजारोपण केले.या लढ्यात मुंडे,चाटे,गर्जे,फड व इतर काही आडनावाचे लोक सहभागी झाले होते. निजाम-सिकंदरजहॉंने हा उठाव मोडून काढण्याचे प्रयत्न केले. पण ते फसले. त्यामुळे कंपनी सरकारला तातडीने या उठावाची माहिती देऊन इंग्रज व निजाम राजवटीला धोका असल्याचे सांगण्यात आले होते. स्थितीचे गांभीर्य ओळखून कंपनी सरकारने लेफ्ट. स्टूथरलॅंडच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्याची बटालियन पाठवली. ही बटालियन १० जुलै १८१८ला बीड जिल्ह्य़ात येऊन धडकली. त्यांच्यासोबत परळी भागातील जमादार शादीखान हाही होता. नवाब मुर्तुजा हाही लढाईत सहभागी झाला होता. स्टूथरलॅंडने नियोजनबद्धपणे गढीवजा असलेल्या डाबीतील बुरुजावर आणि जिल्यातील अन्य काही भागात जसे केज, धारूर, अंबाजोगाई अश्या काही ठिकाणी ही लढाई सुरू झाली. डाबी येथे धर्मराज राजे( मुंडे) व त्याच्या सहकाऱ्यांना घेरले आणि त्यांच्यामध्ये निकराची लढाई सुरू झाली. पावसाळ्याचे दिवस असल्याने रक्ताचा पाट वाहिला. गढीवरून वाहत आलेले रक्त जेथे थांबले ते ठिकाण व दगड या जाज्वल्य लढाईची ओळख म्हणून आजही आदरभावाने पूजले जातात. ‘बुरटॉन ए हिस्ट्री ऑफ हैदराबाद कॉन्टीजन्ट’ ग्रंथात या लढाईत वंजारी समाजाचे लोक मोठय़ा प्रमाणात होते, असा उल्लेख आहे.

राज्य सरकारने १९६९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या बीड जिल्ह्य़ाच्या गॅझेटमध्ये धर्माजी प्रतापराव यांचा स्वातंत्र्यप्राप्तीसाठीचा पहिला लढा म्हणून नोंद आहे. संशोधनात डाबी हे गाव स्पष्ट झाल्यानंतर धर्माजी यांचे आडनाव मुंडे होते, आजही डाबी गावात या लढाईचा स्मृतिस्तंभ पाहावयास मिळतो. [२]

इतिहासात आपल्याला दोन धर्माजी राजेंबद्दल पाहायला मिळते धर्माजी राजे मुंडे व धर्माजी राजे गर्जे हे दोग पण वंजारी समाजाचे होते , वंजारी सेवा संघानुसार ते दोग वेगळे राजे होते व त्यांचा इतिहास ही वेगळा आहे , धर्माजी राजे मुंडे यांनी त्यांचे सरदार घेऊन निझाम आणि इंग्रज सरकार विरुद्ध खूप उठाव केले आणि त्यांचा विरुद्ध अशा खूप प्रथा देशातून प्रथमच चालू केल्या उदाहरण १. इंग्रजांचा बंदुकीच्या कारखान्यात जायचे आणि त्यानला मारून त्यांचेच बंदुकी घेऊन त्यांनाच हरवायचे २. इंग्रजांना आणि निजामाला झाडावर उलट टांगून मृत्यू दंड देईचे , इत्यादी.धर्माजीराजे मुंडे यांनी त्यांची सैन्य व सर्व सरदार घेऊन निझाम आणि इंग्रज सरकार ला खूप वेळेस युद्धात परास्थ केल त्यांचे काही वीर सरदार १.सरदार फड २.सरदार चाटे ३.सरदार मुंडे ४.सरदार जाधवर ५.सरदार गर्जे , इत्यादी. ३१ जुलै १८१८ ला इंग्रज आणि निझाम सरकार एकत्र आले त्यांचा विरुद्ध लढताना क्रांतीवीर धर्माजी राजे मुंडे शहीद झाले पावसाळ्यात रक्ताचे सडे पडले धर्माजी राजे मुंडे वीरगती ला प्राप्त होण्याचा आदी पन्नास जन्नाना मारून गेले व त्यांचा बदला धनगर समाजाने घेतला राजे नवसाजी नाईक धनगरांचे राजे होते पण राजे नवसाजी पण १८१९ ला वीरगती ला प्राप्त झाले .


धर्माजी राजे गर्जे हे बागोजी गर्जे राजेंचे वंशज होते ,बागोजी राजे गर्जे शिवरायांचे चांगले मित्र होते व शिवरायांनी त्यांना क्षत्रिय वंजारी जातीचे राजेपद व प्रतापराव ही पदवी दिली होती आणि राजे बागोजींचे बीड वर राज्य होते व नगर मध्ये पण थोड्या भागात राज्य होते राजे बागोजी गर्जे यांनी खूप किल्ले व मंदिर बांधले व शिवरायांचा स्वराज्याला वाढवायला पूर्ण ताकतीने मदत केली , धर्माजी राजे गर्जे तरुण असताना त्यांनी त्यांचं राज्य वाढवले व नगर आणि बीड जिंकले आणि तिथे राज्य केले . १७८८ ते १८१८ हे तीस वर्ष नगर आणि बीड वर धर्माजी राजे गर्जेंच राज्य होत व या तीस वर्षामध्ये काही वर्ष त्यांनी संपूर्ण मराठवाडा व नगर वर राज्य केले पण एकीकडून इंग्रज तर दुसरी कडून निझाम त्यांचा राज्यावर आक्रमण करत होते मग त्यांचे राज्य फक्त बीड आणि नगर वरच राहिले त्यांनी रामराज्य नी शासन केले व प्रजेची निझाम आणि इंग्रज सरकार पासून तीस वर्षे रक्षा केली पण शेवटी निझाम आणि इंग्रज एकत्र आले आणि मध्य रात्री धर्माजी महाराजांवर आक्रमण केले महाराज तेंव्हा हातोला किल्ल्यात होते आणि राजेंचे सेनाप्रधान खान गद्दार होता कारण त्यानेच महाराजांबद्दल सर्व माहिती दिली होती , इंग्रज आणि निझाम हजारो च्या संख्येत लपून आले होते आणि महाराजांकडे फक्त १० ते १५ सैनिक होते तरीपण धर्माजी महाराज आणि त्यांचे वीर वंजारी लढले महाराज आणि त्यांचे भाऊ पाटलाच्या वाड्यावर वर आले पण सर्व निझाम आणि इंग्रज सैनिक त्यांचा पाटिमाघुन आले मग तिथेच युद्ध चालू झाले , सकाळ झाली शेवटी ला महाराजांचे सर्व वीर वंजारी वीरगतीला प्राप्त झाले आणि महाराजांकडून बीड आणि नगर चे राजेपद हटवले आणि फक्त वंजारी जातीचे राजेपद ठेवले आणि महाराजांना बंदिस्त ठेवले .


धर्माजीराजे मुंडेंचा वाडा आज ही डाबी गावात आहे व समाधी पण आहे आणि खूप पुरावे पण आहेत , धर्माजी राजे व बागोजी राजे गर्जेंचा राज्याची राजधानी आज ही आष्टी तालुक्यातील नागझरी आता चे नाव मोराळा मध्ये आहे किल्ले नागझरी किंव्हा मोराळा किंव्हा गर्जेगड असे त्या मोठ्या गडाला ओळखले जाते व हातोला मध्ये आज पण धर्माजी राजेंचा हातोला किल्ला आहे . धर्माजी राजेंनी नगर आणि बीड च्या सर्व किल्ले तर जिंकलेच पण मराठवायातील पण सर्व किल्ले थोड्या वर्षासाठी जिंकले होते .

संदर्भ[संपादन]

  1. ^ "आज आद्य क्रांतीकारक धर्माजी मुंडे पुण्यतिथी". ३१ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  2. ^ "परळीतील डाबी गावात उभारला स्वातंत्र्याचा पहिला लढा[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". ३१ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]