चर्चा:भारतीय बौद्धांची यादी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • @संदेश हिवाळे आणि अभय नातू: माझी संदेश हिवाळे यांना नम्र विनंती आहे की त्यांनी हा इंग्रजी लेख आणि त्याचा https://en.wikipedia.org/wiki/List_of_Buddhists#Later_Indian_Buddhists_(after_Buddha) हा विभाग पाहून घ्यावा आणि तश्याप्रकारची यादी बनवावी (उपलब्ध लेखांची संदर्भासहित यादी), त्यांनी अनेक याद्या बनवून तोच तोच मजकूर अनेक ठिकाणी लिहिला आहे. आणि भारतीय बुध्दीस्ट असा वर्ग असताना असल्या याद्यांची गरज काय?‌ हे मला कळत नाही. आधीच्या अश्या प्रकारच्या याद्यांचा काहीच सोक्षमोक्ष न लागल्याने मला नविन बनत असलेल्या अश्या याद्यांवर ही सूचना करावीशी वाटली. WikiSuresh (चर्चा) १५:४५, १ जुलै २०१८ (IST)[reply]
सुरेश खोले, ही विश्वकोशीय यादी आहे. उदाहरण म्हणून List of Indian Christians पहावे. अनेक याद्या बनवून तोच तोच मजकूर अनेक ठिकाणी लिहिला आहे. असला प्रकार येथे नाही. म्हणून कृपया मला माझ्या आवडीचे काम करू द्यावे व विनाकारण परेशान करू नये. --संदेश हिवाळेचर्चा १५:५४, १ जुलै २०१८ (IST)[reply]
विश्वकोशीय यादी म्हणजे काय?
या लेखात भारतातील सगळ्या बौद्धांची नावे असणार आहेत का?
अभय नातू (चर्चा) २२:११, १ जुलै २०१८ (IST)[reply]

@अभय नातू: 'विश्वकोशीय यादी' एवजी मला 'विश्वकोशीय लेख' असे म्हणायचे होते. या लेखात भारतातील सगळ्या उल्लेखनिय बौद्धांची नावे असणार आहेत.--संदेश हिवाळेचर्चा १०:०६, २ जुलै २०१८ (IST)[reply]

@अभय नातू, V.narsikar, आणि Tiven2240:,अशा सर्व धर्म/पंथाच्या लोकांच्या याद्या हे विश्वकोशिय लेख असू शकतात का? या मजकुराला संदर्भ कसे देणार? मजकुराची, वर्गांची वेगवेगळ्या प्रकारे पुनरावृत्ती करण्याची ही एक पद्धत पडत आहे. यावर वेळीच भूमिका घ्यावी. उगाच वादात अनेकांचा निष्कारण वेळ वाया जात आहे. संदेश,विपीत असलेले लेख हे वर्ग:भारतीय बौद्ध या पानावर एकत्र येतातच, मग तुमचा असे लेख करण्याचा आग्रह का?
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:३७, २ जुलै २०१८ (IST)[reply]

@सुबोध कुलकर्णी: वर्ग:भारतीय बौद्ध या पानावर सर्व लेख एकत्र येत नाहीत. कारण 'भारतीय बौद्धांची यादी' या पानावर अनेक लेख लाल दुवे असणारेही आहेत. म्हणून "वर्ग:भारतीय बौद्ध म्हणजेच भारतीय बौद्धांची यादी" अशी गल्लत करु नये. धार्मिक लोकांच्या याद्या जर इंग्रजी विपीवर विश्वकोशिय लेख असू शकतात तर मराठी विपीवर का नाही? मी सध्या केवळ या लेखाची सुरुवात केली, अजून अनेक नावे व संदर्भ जोडायचे बाकी आहेत. म्हणून कृपया अनेकांचा निष्कारण वेळ वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी.--संदेश हिवाळेचर्चा १६:३६, २ जुलै २०१८ (IST)[reply]
@सुबोध कुलकर्णी: तुम्हाला हा लेख केवळ 'वर्ग पानांचे लेख रुपांतर' वाटला आहे तर वर्ग:भारताचे पंतप्रधानभारताचे पंतप्रधान, वर्ग:भारताचे राष्ट्रपती - भारताचे राष्ट्रपती आणि यासारख्या अनेक वर्ग-लेखांबद्दल काय म्हणाल ?--संदेश हिवाळेचर्चा १७:०५, २ जुलै २०१८ (IST)[reply]
@संदेश हिवाळे:,
तुम्ही कळीच्या मुद्द्याला बगल दिलीत. या लेखात समावेश होण्यासाठी काय निकष? संदेश हिवाळे म्हणतात हाच आहे का?
लाल दुवे असले तर त्या व्यक्ती उल्लेखनीय नसणार. नाहीतर कोणी तरी ते लेख तयार केले असतेच की. आणि लेख तयार केल्यावर ते वर्गात समाविष्ट होतीलच. मग तुमच्या लाल दुवे असतील या कारणाला जोर उरत नाही.
भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या याद्यांशी या यादीची तुलना करणे हास्यास्पद आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती हे जाहीरीत्या निवडून आलेले असतात.
पुन्हा एकदा इंग्लिशवर आहे मग मराठीवर का नाही ही सबब आणलीत. याबाबतीत नम्रपणे आठवण करुन देऊ इच्छितो की इंग्लिशवरील सगळी धोरणे जशीच्यातशी मराठीवर घेतलेली नाहीत, उदा - सदस्यांना निष्कारण वाद घातल्याबद्दल आणि इतरांबद्दल तुच्छतेचे किंवा व्यक्तिगत आरोप केल्याबद्दल इंग्लिशवर (तुलनेने) टाकोटाक तडीपार केले जाते.
अभय नातू (चर्चा) १९:३६, २ जुलै २०१८ (IST)[reply]


@अभय नातू: तुमच्याद्वारे केवळ वाद घालायचे म्हणून येथे जाणीवपूर्वक माझ्याशी वाद घातले जात आहे. याचे कारण एकच दूषित पूर्वाग्रह. काल हेच अनुभवलेय व उद्या ही हेच होईल. आता तुमच्याशी चर्चा करणेही निव्वळ व्यर्थ आहे कारण नेहमी प्रमाणेच निष्कारण कुरापती करणे व कातीही योग्य बाब असली तर त्याला पुरेपुर चूकीचे ठरवणे हेच तुमचे धोरण बनले आहे (किमान माझ्या बाबतीत). तुम्ही व तुमच्या #कंपूतील काही सदस्यांमुळे होण्याऱ्या सततच्या त्रासाला मी पार कंटाळलो आहे. पुढे तुमच्या सर्वांच्या मनाप्रमाणे धोरणे चालू द्या', मी स्वतःच विकिपीडियावरुन विराम घेतो कायमचा.
@Tiven2240, V.narsikar, आणि सुबोध कुलकर्णी: आपले वेळोवेळी उत्तम सहकार्य मिळाले, आणि तुमचा साथ अप्रतिम राहिला! शेवटचे आभार. --संदेश हिवाळेचर्चा २०:०८, २ जुलै २०१८ (IST)[reply]
@संदेश हिवाळे:,
नेहमीप्रमाणे कांगावा करीत आरोप करणे चालूच आहे.
पूर्वग्रह आणि कुरापती तुम्ही अनेकवेळा काढल्या आहेत. अनेकवेळा त्यांकडे दुर्लक्ष केले, अनेकवेळा सांभाळून घेतले तरीही पुन्हापुन्हा तीच वर्तणूक चालू ठेवलीत.
स्वतःचा मुद्दा नेहमी योग्यच हा हेका धरुन त्यानुसार तुम्ही दिवसेंदिवस वाद घातल्याची अनेक उदाहरणे आहेत.
मी आणि सुबोध कुलकर्णी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर अद्यापही नाही.
कंपू तुमचा आहे/होता. आम्ही असे केले, आम्ही असे करू, आम्हाला वेळ द्या याद्वारे तुम्ही आणि इतर सदस्यांनी वेळोवेळी दाखवून दिलेले आहे.
तुमच्या योगदानापैकी उपयोगी असलेल्या भागाबद्दल धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २०:२८, २ जुलै २०१८ (IST)[reply]
माझा मुद्दा कसा चूकीचा आहे हेच दाखवण्याचे काम तुम्ही सतत करताय.
कंपू तुमचाच आहे.
सुबोध कुलकर्णी यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत, मात्र चर्चा साधारण होत असताना तुम्ही नेहमीप्रमाणे चर्चा वादाकडे वळवली.
तुमचे प्रश्न हे तुमच्या पूर्वग्रहाने ग्रासलेले असतात. पण तुम्ही प्रचालक असल्याने बरेच जणांना हे वाटत नसणार.
आम्ही असे केले, आम्ही असे करू, आम्हाला वेळ द्या हे शब्द तुमच्या मेंदुची उपज आहे. मी केवळ एकाच चर्चेत 'आम्ही' शब्द वापरला होता. मात्र तुम्ही असे शब्द नेहमीच वापारतो असा कांगावा केलात व करताय.
स्वतःचेच खरे म्हणण्याचा रेटा व पूर्वग्रह तुम्ही कधीही सोडू नका.--संदेश हिवाळेचर्चा २१:२६, २ जुलै २०१८ (IST)[reply]
रावसाहेब,
मुद्दा बरोबर असेल तर ते दाखवा ना? थेट व्यक्तिगत पातळीवर नेहमी का उतरता?
कंपू तुमचाच आहे असे नुसते म्हणल्याने ते खरे ठरत नाही. मी उदाहरणे दिली, तुम्ही नुसता हवेत गोळीबार.
माझ्या प्रश्नाला उत्तर दिले नाही आणि कुलकर्णींच्या प्रश्नालाही उत्तर दिले नाही. म्हणून त्यांनी चर्चा चालू ठेवली. मला साद दिल्याने मी वाचून तुम्हाला प्रश्न विचारला. त्याला उत्तर न देता पुन्हा एकदा कांगावा सुरु केलात आणि पोरकटपणे तुम्ही कांगावा केला व करताय हे खोटे आरोप.
पूर्वग्रहाना ग्रासलेले तुम्ही आहात हे तुमच्या लिखाणावरुन आणि योगदानावरुन स्पष्ट होते आहे.
पूर्वीच्या चर्चा पहा. अनेकदा हेका धरुन ठेवून चर्चा वाहवत नेलेली आहेत.
आता शेवटचा रामराम केल्यावरही पुन्हा चालू ठेवणार असाल तर बोलणे चालूच ठेवा.
सतत तेचतेच बोलून खरे ठरते का हे बघत असाल तर सांगतो - असे होत नसते.
येथे लिहिलेल्या तुमच्या इतर दीडशहाणपणास उत्तर देत नाही.
अभय नातू (चर्चा) २१:५४, २ जुलै २०१८ (IST)[reply]