Jump to content

अंजली जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


डॉ. अंजली जोशी या एक मानसशास्त्रज्ञ, लेखिका व प्राध्यापिका असून त्या 'वेलिंगकर व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्था, मुंबई' येथे मानव संसाधन विभागाच्या उप-विभाग प्रमुख व प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. या क्षेत्रात २८ वर्षांहून अधिक काळ त्यांनी काम केले आहे.

डॉ. जोशींनी समुपदेश मानसशास्त्रात (Counselling Psychology) एम. ए., विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्रावर (REBT Psychotherapy) संशोधन करून पी. एच. डी. आणि वृद्धत्व समुपदेशनावर (Geriatric Counselling) एम. फिल. असे शिक्षण घेतले आहे. त्यांनी विविध संस्थांमध्ये अनेक सत्रे व कार्यशाळा घेतल्या आहेत. तसेच वैयक्तिक समुपदेशन, समूह समुपदेशन, कर्मचारी व औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रम, परिणामकारक स्वयं-व्यवस्थापनावरील कार्यशाळा असे विविधांगी कार्य त्या करत आहेत.[१]

पुस्तके[संपादन]

  • मी अल्बर्ट एलिस (विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचे जनक अल्बर्ट एलिस यांच्या जीवनप्रवासाचा, झुंजार व्यक्तिमत्त्वाचा व अमूल्य विचारधनाचा मागोवा घेणारी आत्मचरित्रात्मक कादंबरी)[२]
  • विवेकी पालकत्व (विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या दृष्टिकोनातून पालकांना मार्गदर्शन)[३]
  • अल्बर्ट एलिस : विचारदर्शन (सहलेखक - कि.मो. फडके, अल्बर्ट एलिस यांच्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राची सखोल ओळख करून देणारा अभ्यासग्रंथ)[४]
  • विरांगी मी! विमुक्त मी! (स्त्रियांच्या लैंगिक मुक्तीचा धाडसी प्रचार करणारी अमेरिकी स्त्रीवादी 'बेटी डॉडसन' हिच्या जीवनावर आधारित कादंबरी.अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा विशेष ग्रंथ पुरस्कार प्राप्त)
  • लक्षणीय ५१ (जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञांनी लिहिलेल्या ग्रंथांचा सांगोपांग परिचय).
  • झाले मोकळे आकाश (सहलेखिका - कल्याणी भागवत, भावनिक आणि वैचारिक वादळांचा वेध घेणारा कथासंग्रह)
  • सायक्रोस्कोप (दैनंदिन जीवनात अनुभवास येणाऱ्या मानसिक घडामोडी बारकाव्यांनिशी दाखविणारा लेखसंग्रह)
  • गुरू विवेकी भला (विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचे भारतातील जनक व लेखिकेचे गुरू 'कि. मो. फडके' यांच्या सोबतच्या गुरू-शिष्य नात्याचा सुहृद प्रवास)
  • I am Albert Ellis (Translated By - Meenal Kelkar. English translation of Marathi novel 'मी अल्बर्ट एलिस'. Autobiographical novel based on life of 'Albert Ellis', founder of Rational Emotive Behavioural Therapy)
  • Rational Emotive Behaviour Therapy Integrated (Co-author - K. M. Phadake, Book provides a comprehensive view of REBT, and presents a vivid account of Dr Albert Ellis’ life and his contributions to the development of REBT)

पुरस्कार[संपादन]

  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा ललित ग्रंथ पुरस्कार

[ संदर्भ हवा ]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Joshi, Anjali (2024). "LinkedIn Profile". LinkedIn.
  2. ^ Joshi, Anjali (2009). Mee Albert Ellis. Mumbai: Shabd Publication. ISBN 978-93-82364-10-8.
  3. ^ Joshi, Anjali (2011). Viveki Palkatva. Mumbai: Shabd Publication. ISBN 978-81-922898-5-4.
  4. ^ Joshi Anjali, K. M. Phadake (2016). Albert Ellis Vichardarshan. Mumbai: Shabd Publication. ISBN 978-93-82364-49-8.