सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ - २४८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात सोलापूर उत्तर तालुक्यातील सोलापूर महसूल मंडळ आणि सोलापूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.१ ते ५, १५ ते २८, ४८ ते ४९, ५२ ते ६५ आणि ६८ ते ८८ यांचा समावेश होतो. सोलापूर शहर उत्तर हा विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख हे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख भारतीय जनता पक्ष
२०१४ विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख भारतीय जनता पक्ष
२००९ विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

विजय कुमार देशमुख हे चालू आमदार आहेत व परिवहन राज्यमंत्री आहेत

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]