साबरमती नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साबरमती नदी

साबरमती नदीची एकूण लांबी ३७१ किमी आहे. या नदीचा उगम राजस्थान मधील अरवली पर्वतरांगेत झाला आहे. राजस्थान मधील अरवली रांगांच्या मेवाड टेकड्यांमध्ये साबर व हाथमती या नद्यांच्या संयुक्त प्रवाहानंतर तीला "साबरमती" असे म्हटले जाते. ही नदी राजस्थानगुजरात या राज्यांमधून वाहणारी नदी आहे. ही नदी उत्तर - दक्षिण वाहते. शेवटी खंबातच्या आखातास जाऊन मिळते.