साफो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साफो

साफ्फो (ग्रीकःΣαπφώ)(ख्रिस्तपूर्व ७०० वर्षे) ही ग्रीक कवयित्री होती. ती ग्रीस मध्ये लेसवोस (ग्रीक उच्चार) (इंग्रजी Lesbos) नावाच्या बेटावर राहत असे. ग्रीक इतिहासकार स्ट्राबो ने ही साफोचा उल्लेख केला आहे. ती समलैंगिक होती असे म्हणतात. साफोचे स्वातंत्र्य ग्रीक समाजाने मान्य केले नाही. तिची लैंगिकता किंवा त्यावरची काव्य मांडणी ही तिच्यावर झालेल्या अन्यायातून आली असावी. तिचे प्रेम हे स्त्री व पुरुष दोघांवरही होते असे काव्यात दिसते. पण या काव्यात शारीर वर्णने नाहीत. किंवा तसे पुरावे सापडलेले नाहीत त्यामुळे काही इतिहासकार तिला लेस्बियन मानत नाहीत.

जीवन[संपादन]

साफो चांगल्या घराण्यात जन्माला आली होती. साफोच्या आईचे नाव व तिच्या मुलीचे नाव एकच क्लेई होते. साफो उच्च घराण्यातली असल्याने तिला अनेक प्रकारचे स्वातंत्र्य होते. साफोला तीन भाऊ होते. तिचे फॉन नावाच्या व्यक्तीवर प्रेम होते. 'तो' मिळाला नाही म्हणून तिने आत्महत्या केली असाही एक प्रवाद आहे. पण प्राचीन ग्रीस मध्ये फॉन हा प्रेमाचा देवही मानला जातो. त्यामुळे ती शक्यताही पूर्णपणे मान्य होत नाही. तिला काहीकाळ लेस्बोसवरून सिसिलीला हद्दपार करण्यात आले होते. शेवटी तिने या सर्वाला कंटाळून आत्महत्या केली असाही प्रवाद आहे.

लेखन[संपादन]

काळाच्या ओघात साफोचे काव्य नष्ट झाले आहे. परंतु तिचे काही काव्य खंडीत स्वरूपात सापडते आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]